पिंपरी (Pclive7.com):- लायन्स क्लब ऑफ पुना निगडीच्या वतीने पदग्रहण सोहळ्यात मनिषा गायकवाड यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली. पदग्रहण सोहळा नुकताच पार पडला. इन्स्टॉलिंग ऑफिसर लायन राज मुछाल यांच्या हस्ते शपथविधी सोहळा पार पडला.

रीजन चेअरपर्सन शैलजा सांगळे, झोन चेअरपर्सन मीनांजली मोहिते, माजी नगरसेवक व स्टँडिंग कमिटी चेअरपर्सन सीमाताई सावळे, सारंग कामतेकर, कॅबिनेट सचिव रवींद्र गोलार, कॅबिनेट खजिनदार विजय जाजू, लायन्स इंटरनेशनलचे इतर पदाधिकारी पल्लवी देशमुख, अनिल झोपे, वसंत भाऊ कोकणे आदि सदस्यांची यावेळी उपस्थिती होती. तसेच मनीषा गायकवाड यांचे पती प्रमोद गायकवाड, कुटुंबीय, मित्रपरिवार, निगडी क्लबचे सर्व सदस्य व इतर क्लबचे अधिकारी आणि सदस्य उपस्थित होते.
नवनिर्वाचित अध्यक्षांनी शपथग्रहनानंतर मातृसेवा वृद्धाश्रमाला अडल्ट डायपर आणि हँडग्लोव्हस यांची मदत केली. गरजू महिलेला मिक्सर मदत म्हणून देण्यात आला. इतर २२ सेवाकार्य करुन कार्यक्रम पार पडला. यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.























Join Our Whatsapp Group