पिंपरी (Pclive7.com):- औद्योगिक क्रीडा संघटनेची ६१ वी जलतरण स्पर्धा दि.१८ ऑगस्ट २०२४, रविवार कै.अण्णासाहेब मगर जलतरण तलाव नेहरूनगर येथे संपन्न झाली. या स्पर्धेचे आयोजन “सँडविक एशिया”नी केले. या स्पर्धेस टाटा मोटर्स, एसकेएफ, सँडविक एशिया, बजाज ऑटो आकुर्डी, बजाज ऑटो चाकण, टॅको, टीकेआयएल, जेड ग्लोबल, पर्सिस्टंट, ब्रिव्ह्ज टेक्नॉलॉजी, महिंद्रा अँड महिंद्रा, जेसीबी, प्राज इंडस्ट्रीज, बॉश, फॉरविया फॉरेएशिया, ओक्सवॅगन स्कोडा, कोफोर्ज, व्हर्टलेस वगैरे १९ कंपन्यांच्या ८१ स्पर्धकांनी भाग घेतला. ही स्पर्धा एकूण सात गटांमध्ये झाली. या स्पर्धेत महिलांचाही मोठा सहभाग होता.

या स्पर्धेचे उद्घाटन सँडविक एशिया एम्प्लॉईज क्लब अध्यक्ष जितेंद्र भोर यांनी केले. याप्रसंगी ते म्हणाले की, यावर्षी पोहण्याच्या स्पर्धेला खेळाडूंचा उदंड प्रतिसाद लाभला आहे. यातूनच अनेक भावी खेळाडू निर्माण व्हावेत ही आमची इच्छा आहे. स्पर्धेचे सुरुवातीला प्रास्ताविक प्रदीप वाघ यांनी केले. सूत्रसंचालन दुष्यंत गायकवाड यांनी केले. टाटा मोटर्स स्पोर्ट्स कमिटीचे अध्यक्ष शशिकांत कात्रे, प्रवीण तांबे (एचआर मॅनेजर, टाटा मोटर्स), अतुल काळोखे (एचआर मॅनेजर, बजाज ऑटो), दत्ता गायकवाड (एचआर मॅनेजर, महेंद्र अँड महेंद्र) तसेच औद्योगिक क्रीडा संघटनेचे प्रवीण तांबे, हरी देशपांडे, विजय हिंगे, प्रदीप वाघ, अतुल काळोखे, राहुल कापसे, श्रीनिवास मोरे, मंदार कुलकर्णी उपस्थित होते. या स्पर्धेचे युट्युबसाठी प्रत्यक्ष प्रक्षेपण मंदार कुलकर्णी यांनी केले.
स्पर्धेचे पारितोषिक वितरण सँडविक एशिया एम्प्लॉईज युनियन जनरल सेक्रेटरी नितीन पवार, विजय परदेशी, गोगावले, उपाध्यक्ष गिरीश मुळूक, जनरल सेक्रेटरी दुष्यंत गायकवाड, खजिनदार मंगेश मुठे, सभासद अभय तळदेवकर, सचिन लोहार, योगेश देशपांडे, प्रवीण तांबे (एचआर मॅनेजर,टाटा मोटर्स), अतुल काळोखे (एचआर मॅनेजर, बजाज ऑटो) यांनी केले.
याप्रसंगी बोलताना सँडविक एशिया एम्प्लॉईज युनियन जनरल सेक्रेटरी नितीन पवार म्हणाले की, ही स्पर्धा अत्यंत चुरशीची आणि खेळमिळीच्या वातावरणात झाली. स्पर्धेस मिळालेला प्रतिसाद बघून मला अतिशय आनंद होत आहे. स्पर्धेस उपस्थित असलेले प्रेक्षक व खेळाडू स्पर्धकास उत्तेजन देत होते. मला वाटते कुठल्याही स्पर्धेमध्ये उत्तेजन हे स्पर्धकांमध्ये चैतन्य निर्माण करतं व स्पर्धक आपले ध्येय गाठण्यासाठी प्रयत्नशील राहतो.
ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी राम मासुळकर, पाटील सर, हरी देशपांडे, विजय हिंगे, प्रदीप वाघ यांनी मोलाचे सहकार्य केले. समारंभाच्या शेवटी दुष्यंत गायकवाड यांनी आभार प्रदर्शन केले. या स्पर्धेच्या समयी खेळाडूंना प्रोत्साहित करण्यासाठी राज्यस्तरीय व राष्ट्रीय पातळीवर खेळलेले ज्येष्ठ खेळाडू बाळकृष्ण मुळूक, नंदू जाधव, राम मासुळकर, पाटील सर हेही उपस्थित होते.
स्पर्धेचे निकाल खालील प्रमाणे आहेत. स्पर्धेमध्ये “सँडविक एशिया”ने विजेतेपद तर जेड ग्लोबलने उपविजेतेपद मिळविले.
पुरुष
५०मी,फ्रीस्टाइल,४०वर्षांखालील: १)गिरीश मुळूक-सँडविक एशिया (३०.४७), २) शैलेश मुळूक-कोफोर्ज (३२ॱ६४), ३) अमेय एंचवार-बजाज ऑटो,आकुर्डी (३६.७१)
५०मी,बटरफ्लाय,४०वर्षांखालील: १) गिरीश मुळूक-सँडविक एशिया (३७.७६), २) शैलेश मुळूक-कोफोर्ज (४०.८३), ३) अमेय एंचवार-बजाज ऑटो,आकुर्डी (४९.७७)
५०मी,बटरफ्लाय,४०वर्षांवरील: १) उदय खरसन-जेड ग्लोबल (४२.६२), २) मुकुंद शेळके-टाटा मोटर्स (४६ॱ३२), ३) प्रमोद साळुंखे-टाटा मोटर्स (५८.६४)
५०मी,ब्रेस्टस्ट्रोक,४०वर्षावरील: १) महेश यादव-टाटा मोटर्स(४४से), २) उदय खरसन-जेड ग्लोबल (४५ॱ४२ से), ३) मुकुंद शेळके-टाटा मोटर्स (४६से)
५०मी,फ्रीस्टाइल,४०वर्षांवरील: १) उदय खरसन-जेड ग्लोबल(३२.४१,२)महेश यादव-टाटा मोटर्स(३४), ३) मुकुंद शेळके-टाटा मोटर्स (४१.६६)
५०मी,बॅकस्ट्रोक,४०वर्षांवरील: १) उदय खरसन-जेड ग्लोबल (४१.०२), २) महेश यादव-टाटा मोटर्स (४१.६५), ३) सतीश जाधव- सँडविक एशिया (५६)
१००मी, फ्रीस्टाइल, ४०वर्षाखालील: १) गिरीश मुळूक-सँडविक एशिया (१.१७.६०), २) अमेय एंचवार-बजाज ऑटो,आकुर्डी (१.२९.६२), ३) महेश चकणे (१.३९)
१००मी, ब्रेस्टस्ट्रोक, ४०वर्षाखालील: १) श्रेयस अभ्यंकर फॉरविया (१.३२), २) गिरीश मुळूक सँडविक एशिया (१ॱ३९), ३) शैलेश मुळूक कोफोर्ज (१.५०)
१००मी, बॅकस्ट्रोक, ४०वर्षांखालील: १) गिरीश मुळूक-सँडविक एशिया (१.३५), २) प्रवीण गुरव सँडविक-एशिया (२.२१.७४), ३) निलेश पाटोळे-सँडविक एशिया (२.३४.०५)
महिला
५०मी फ्रीस्टाइल, ४०वर्षाखालील: १) वृषाली मगर-फॉरविया (४६.३९), २) गार्गी गोळे-बजाज ऑटो (४७.८४), ३) धनश्री नलावडे-फ्लॅश पॉइंट (४८)
५०मी फ्रीस्टाइल, ४०वर्षांवरील: १) सुप्रिया खरसण-परसिस्टंट (५८.३६)
५०मी ब्रेस्टस्ट्रोक, ४०वर्षाखालील: १) गार्गी गोळे -बजाज ऑटो (५७.७४), २) धनश्री नलावडे -फ्लॅश पॉइंट (१.०७), ३) जॉयना सूर्यवंशी-फॉरविया (१.३२)
५०मी ब्रेस्टस्ट्रोक,४०वर्षांवरील:१)सुप्रिया खरसण-परसिस्टंट(१.४७)
५०मी,बॅकस्ट्रोक, ४०वर्षांखालील: १) धनश्री नलावडे -फ्लॅश पॉइंट (१.०३).
औद्योगिक क्रीडा संघटनेचे व सँडविक एशिया एम्प्लॉईज युनियनचे पदाधिकारी विजेत्या संघांसमवेत डावीकडून अभय तळदेवकर,प्रदीप वाघ,विजय हिंगे,हरी देशपांडे,प्रवीण तांबे,बाळकृष्ण मुळूक,राम मासुळकर,नितीन पवार,मंगेश मुठे,दुष्यंत गायकवाड,गिरीश मुळूक दिसत आहेत.























Join Our Whatsapp Group