पिंपरी (Pclive7.com):- पवना सहकारी बँकेची आर्थिक स्थिती भक्कम असल्याचा विश्वास बँकेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे यांनी व्यक्त केला आहे. २०२३-२४ चा वार्षिक अहवाल सभेपुढे सादर करताना बँकेच्या प्रगतीची माहिती दिली. ठेवींचे वाढते प्रमाण त्याचप्रमाणे कर्ज विषयक धोरणे आदी विषयांची माहिती देत असताना त्याचे सर्व श्रेय बँकेचे सभासद, खातेदार व कर्मचाऱ्यांना दिले.

पवना सहकारी बँकेची ५१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच रागा पॅलेस, काळेवाडी या ठिकाणी झाली. चालू आर्थिक वर्षात बँकेला ५ कोटी २५ लाख निव्वळ नफा झाला.

बँकेच्या व्यवसायामध्येही वाढ झालेली. वार्षिक सर्वसाधारण सभेत बँकेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे यांनी १२ लाभांश जाहीर केला. यावेळी बँकेचे उपाध्यक्ष वसंत लोंढे, ज्येष्ठ संचालक विठ्ठल काळभोर, शांताराम गराडे, शिवाजी वाघेरे, जयनाथ काटे, जितेंद्र लांडगे, सुनील गव्हाणे, शरद काळभोर, सचिन चिंचवडे, अमित गावडे, सचिन काळभोर, चेतन गावडे, बिपीन नाणेकर, दादू डोळस, संभाजी दौंडकर, जयश्री गावडे, ॲड. ऊर्मिला काळभोर, तज्ज्ञ संचालक ॲड. गोरक्षनाथ काळे व ॲड. नितीन लांडगे उपस्थित होते.



















Join Our Whatsapp Group