पिंपरी (Pclive7.com):- गणेशोत्सवाच्या काळात गणेश मंडळांचे देखावे बघण्यासाठी नागरिक मोठ्याप्रमाणावर शहराच्या मध्य भागात येत असतात. नागरिकांच्या सुविधेसाठी गणेशोत्सव काळात मेट्रोच्या वेळात बदल करून मेट्रोची प्रवासी सेवा मध्यरात्रीपर्यंत चालवण्यात येणार आहे. तसेच मेट्रो फेऱ्यांच्या संख्येतही वाढ करण्यात येणार आहे.

अनंत चतुर्दशीच्या दिवशी दिनांक १७/०९/२०२४ ते १८/०९/२०२४ सकाळी ६ ते दुसऱ्या दिवशी सकाळी ६ पर्यंत असे २४ तास मेट्रो सेवा अखंड सुरु असणार आहे. दिनांक ७/८/२०२४ ते ९/८/२०२४ या दोन दिवसात मेट्रो सकाळी ६ ते रात्री ११ पर्यंत सुरु असेल. दिनांक १०/८/२०२४ ते १६/८/२०२४ या दिवसात मेट्रो सकाळी ६ ते रात्री १२ पर्यंत सुरु असेल.
दिनांक १८/०९/२०२४ रोजी मेट्रो सेवा सकाळी ६ ते रात्री १० अशी नियमित सुरु असणार आहे. म्हणजे दिनांक १७/०९/२०२४ सकाळी ६ ते १८/०९/२०२४ रात्री १० अशी मेट्रो सेवा अखंड ४० तास सुरु राहणार असल्याची माहिती मेट्रो प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.
|
दिनांक |
मेट्रोच्या प्रवासी सेवेची वेळ |
प्रवासी सेवेचे एकूण वेळ |
|
७/८/२०२४ ते ९/८/२०२४ |
सकाळी ६ ते रात्री ११ पर्यंत |
१७ |
|
१०/८/२०२४ ते १६/८/२०२४ |
सकाळी ६ ते रात्री १२ पर्यंत |
१८ |
|
१७/०९/२०२४ ते १८/०९/२०२४ |
सकाळी ६ ते दुसऱ्या दिवशी सकाळी ६ पर्यंत |
२४ |
मेट्रो सेवेचा प्रवाश्यांची लाभ घ्यावा त्यामुळे रस्त्यावरची वरदळ कमी होण्यास मदत होईल.






















Join Our Whatsapp Group