पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी येथील माजी नगरसेवक संदीप वाघेरे यांच्या वतीने शिवराज्य चौक येथे गणेशोत्सव निमित्त कृत्रीम विसर्जन हौद व गणेश मूर्ती संकलन केंद्राची निर्मिती करण्यात आलेली आहे. या केंद्राचे उद्घाटन ह.भ.प. माऊली महाराज वाळुंजकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

या विषयी अधिक माहिती देताना वाघेरे म्हणाले कि, पिंपरी चिंचवड शहरामध्ये पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यात यावा, या करिता सालाबाद प्रमाणे याही वर्षी शिवराज्य चौक तपोवन मंदिर रोड पिंपरीगाव या ठिकाणी विसर्जन हौद व संकलन केंद्राची निर्मिती करण्यात आली आहे. सदर केंद्रामध्ये नागरिकांना तसेच गणेशोत्सव मंडळ व संस्था यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. या करिता ३ फूट उंच व ४ मीटर रुंदीचे दोन कुत्रीम हौदांची निर्मिती करण्यात आली असून नागरिकांना गणेशाच्या आरती करिता ७० X १०० आकाराचा भव्य मंडप देखील उभारण्यात आला आहे. या उपक्रमाचा जास्तीत जास्त लाभ गणेश भक्तांनी घ्यावा असे आवाहन संदीप वाघेरे यांनी केले आहे.
सदर कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी माजी नगरसेवक संदीप वाघेरे, संदेश गोलांडे, जयवंत शिंदे, रामभाऊ कुदळे, गोकुळ भुजबळ, विजय जाचक, दुंडय्या स्वामी, सुधाकर यादव, अशोक कुदळे, अनिल रसाळ, पोपट महाराज इंगळे, हनुमंत वाघेरे, संदीप कापसे आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच कार्यक्रमाचे नियोजन मयूर बोडगे, गणेश मंजाळ, सारथी काळे, सचिन वाघेरे, शेखर अहिरराव, समीर वाघेरे यांनी केले.






















Join Our Whatsapp Group