पिंपरी (Pclive7.com):- त्रिवेणीनगर येथील श्रीकृष्ण मित्र मंडळाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

श्रीकृष्ण मित्र मंडळ त्रिवेणीनगर यांच्या वतीने मंडळाचे रौप्य महोत्सवीवर्षा निमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आली होते. पिंपरी-चिंचवड ब्लड बँकेच्या सहकार्याने राबवलेल्या या शिबिरात एकूण ७४ रक्तदात्यांनी रक्तदान करत सहभाग घेतला. यामध्ये महिला वर्गाचा चांगला प्रतिसाद मिळाला. यावेळी मंडळाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष स्वप्नील हनुमंतराव खोत यांनी दिली.






















Join Our Whatsapp Group