चिंचवड (Pclive7.com):- अबॅकस स्पर्धेत रावेत येथील एस.बी.पाटील शाळेमधील श्रीनीथी सुमेध गायकवाड हिने राज्यात दुसरा क्रमांक पटकावला आहे. आयडियल प्ले अबॅकस इंडिया या शैक्षणिक क्षेत्रातील नामांकित असणाऱ्या संस्थेच्या वतीने लोणी काळभोर येथे अठरावी राष्ट्रीय पातळीवरील अबॅकस परीक्षा घेण्यात आली. या स्पर्धेमध्ये पुणे नगर सोलापूर नाशिक औरंगाबाद कोल्हापूर सांगली यासह अनेक जिल्ह्यामधून तब्बल ३००० पेक्षा अधिक विद्यार्थी या परीक्षेमध्ये सहभागी झाले होते.

पिंपरी चिंचवड मधील रावेत येथील एस.बी.पाटील शाळेमधील विद्यार्थिनी श्रीनीथी सुमेध गायकवाड हिने या स्पर्धेमध्ये आपला ठसा उमटवला. व नेत्र दीपक कामगिरी करताना राज्यात दुसरा क्रमांक मिळवला.
राज्य पातळीवरील कार्यक्रमांमध्ये श्रीनीथी गायकवाड हिला द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक देण्यात आले. कार्यक्रमास डॉ. संगीता कामत, अमुधा मैडम उपस्थित होते. तसेच स्वाती मुथ्था (वंडर किड्स निगड़ी) लता पारेख, सीमा जहा. या सर्व शिक्षकानी तिला मोलाचे मार्गदर्शन केले.






















Join Our Whatsapp Group