पिंपरी (Pclive7.com):- अण्णासाहेब मगर बँक व्यवस्थापन व सेवक यांच्यामध्ये वेतनकरार संपन्न झाला. या वेतनकरारामध्ये सेवकांना भरघोस वेतनवाढ झाल्याचे बँकेचे अध्यक्ष नंदकुमार लांडे यांनी जाहीर केले. त्यामुळे बँकेच्या सेवकांचा गुढी पाडवा गोड झाला आहे.
वेतनकरार २०१५-१६ ते २०१९-२० या कालावधीसाठी झाल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच बँकेची आर्थिक परिस्थिती उत्तम असल्याने हा वेतनकरार बँकेने एकूण पाच वर्षासाठी केला आहे. या वेतन करारामुळे सेवकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. या वेतनकरारामध्ये सर्व सेवकांना समान न्याय देण्याचा बँकेने प्रयत्न केला आहे. करारानुसार सेवकांना पद व सेवा ज्येष्ठतेनुसार किमान चार हजार तर कमाल सोळा हजार रुपयांपर्यंतची वेतनवाढ मिळणार आहे. त्याचा लाभ ७७ सेवकांना होणार आहे. हा सर्वसमावेशक करार असल्याचे नंदु लांडे यांनी नमूद केले.
या करारावर व्यवस्थापन समितीच्या वतीने अध्यक्ष नंदकुमार लांडे, उपाध्यक्ष विठ्ठल सांडभोर, संचालक अँड. घनशाम खलाटे, शंकर मेटकरी मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन कुलकर्णी यांनी स्वाक्षरी केली. तसेच सेवकांचे प्रतिनिधी म्हणून संध्या द्विवेदी, तुषार मखामले, आदिनाथ देवकर, सरिता लुंकड, जयेश फुगे यांनी स्वाक्षरी केली. यावेळी संचालक मनोज बोरसे, गणेश पवळे, राजेश सस्ते, विजय गवारे, दीपक डोळस, लालचंद राठोड, सुलोचना भोवरे, सविता मोहरुत, सोनल लांडगे आदी उपस्थित होते.





















Join Our Whatsapp Group