पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय तसेच शहरातील नागरिकांच्या दृष्टीने आज अत्यंत महत्वाचा दिवस होता. राज्याचे उपमुख्यमंत्री व पुणे जिल्हाचे पालकमंत्री अजित पवार यांनी ४९ बोलेरो निओं, ०६ स्कॉर्पिओ, ०२ महिंद्रा एक्सयुव्ही ७०० असे एकूण ५७ वाहनांना फ्लॅग दाखवुन सदरची वाहने पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील वाहन ताफ्यात समाविष्ट केले. तसेच यावेळी अजित पवार यांच्या हस्ते पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात पासपोर्ट पडताळणीकरिता काम करणारे अमंलदार यांना टॅबचे वाटप करणेत आले.

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात नव्याने दाखल होणारे अधिकारी व अमंलदार यांना कायद्यातील तरतुदी, शासनाने तसेच पोलीस महासंचालक कार्यालयाने वेळोवेळी निर्गमित केलेले परिपत्रके, स्थायी आदेश तसेच मार्गदर्शक सुचनांचे अधीन राहुन काम करता यावे या उद्देशाने पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी तयार केलेल्या कार्यपुस्तिकेचे अनावरण अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील संगणक शाखेत महिला पोलीस कॉन्स्टेबल वर्षा राऊत यांनी ई ऑफीसचे कामकाज यशस्वीरित्या पूर्ण करण्यात मोलाचा वाटा उचल्याबद्दल त्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविणेत आले.
या योजनांबाबत चर्चा करण्यात आली..
१) बावधन, संत तुकाराम नगर, काळेवाडी, दापोडी हे नव्याने होणारे चार पोलीस स्टेशन.
२) चिखली पोलीस स्टेशन हद्दीतील मोशी येथील ०९ एकर जागेवर नव्याने उभारण्यात येणारे पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाची अतिशय भव्य, अद्ययावत व सर्व सुविधांनी सुसज्य अशा नवीन इमारतीचा आराखडा.
३) वाकड येथील १५ एकर जागेवर पोलीस अधिकारी व अमंलदार यांचे निवासस्थाने बांधणे संदर्भात.
४) वाढते सायबर गुन्हांचे अनुषंगाने मंजूर झालेले आयुक्तालयातील सायबर पोलीस ठाणे संदर्भात.
५) पिंपरी पोलीस स्टेशन, आळंदी पोलीस स्टेशन इमारत, २०० क्वार्टर्स.
६) १६ हजार स्केअर फीट क्षेत्रवर कंपन्याचे सीएसआर फंडातून नव्याने अद्ययावत उभारणेत येणारे म्हाळुंगे एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशन आदीबाबत विस्तृत चर्चा करण्यात आली.
या कार्यक्रमास खासदार श्रीरंग बारणे, आमदार अश्विनी जगताप, अण्णा बनसोडे, उमा खापरे, पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, महापालिका आयुक्त शेखर सिंह, पोलीस सह आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, संदिप डोईफोडे (गुन्हे) पोलीस उप-आयुक्त, स्वप्ना गोरे पोलीस उप-आयुक्त, (परि१), डॉ. शिवाजी पवार पोलीस उप- आयुक्त, (परि ३), माधुरी कांगणे (मुख्यालय) पोलीस उप-आयुक्त, डॉ. विशाल हिरे (गुन्हे) सहायक पोलीस आयुक्त, इतर पोलीस अधिकारी व अमंलदार तसेच नागरिकांच्या उपस्थितीत सदरचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.
Tags: उपमुख्यमंत्री अजित पवारपिंपरी चिंचवडपिंपरी चिंचवड पोलिसांच्या ताब्यात ५७ नवीन वाहनेपिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय
























Join Our Whatsapp Group