मावळ (Pclive7.com):- जमिनीची मोजणी करण्यासाठी आलेल्या भूमी अभिलेख विभागाच्या अधिकाऱ्यांना चौघांनी मारहाण केली. ही घटना १० ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास मावळातील गोडुंब्रे गावात घडली.
भूकरमापक रोहितकुमार रामकृष्ण जाधव (३९) यांनी या प्रकरणी शिरगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. गिरीश आगळे, राजाराम बाळासाहेब आगळे, मिलिंद आगळे, आकाश आगळे (सर्व रा. गोडुंब्रे, ता. मावळ) यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
गोडुंब्रे गावातील रहिवासी योगेश बाळासाहेब ढमाले यांनी वडगाव मावळ भूमी अभिलेख कार्यालयात त्यांच्या जमिनीची मोजणी करण्यासाठी अर्ज केला होता. त्यावरून भूमी अभिलेख विभागाचे अधिकारी १० ऑक्टोबर रोजी सायंकाळी मोजणी करण्यासाठी गेले. त्यावेळी संशयितांनी त्यांना मोजणी करू न देता त्यांच्याशी वाद घातला. भूकरमापक रोहितकुमार यांना संशयितांनी मारहाण केली.






















Join Our Whatsapp Group