पिंपरी (Pclive7.com):- आकुर्डीतील मुख्य रस्ता मृत्यूचा सापळा बनला आहे. येथील रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. आज सकाळपासून या खड्ड्यांमुळे अनेकांचे अपघात झाले असून अनेकजण जखमी झाले आहेत. महापालिका प्रशासनाने तातडीने येथील खड्डे बुजवावेत अशी मागणी होत आहे.
पिंपरी ते निगडी मेट्रोच्या विस्तारित मार्गाचे काम सध्या सुरू आहे. त्यामुळे निगडी ते पिंपरी मार्ग अत्यंत छोटा झाला असून आकुर्डीमध्ये या मार्गावर खड्डा पडला असून या खड्ड्यांमुळे सकाळच्या सुमाराला एका तरुणाचा अपघात झाला. त्यात तो जखमी झाला असून त्याच्या पायाला मोठी दुखापत झाली आहे. सकाळ पासून या खड्ड्यांमुळे पाच जणांचा अपघात झाल्याचे नागरिकांनी म्हटलं आहे. तरी हा खड्डा तातडीने बुजवावा अन्यथा एखादा मोठा अपघात होऊन बळी जाऊ शकतो असे स्थानिक नागरिकांनी म्हटले आहे.






















Join Our Whatsapp Group