पिंपरी (Pclive7.com):- विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी (दि.२०) मतदान होत असून यासाठी मंगळवारी (दि.१९) रोजी अधिकारी, कर्मचाऱ्यांना तीन ठिकाणी मतदान यंत्रे व इतर साहित्याचे वाटप केले जाणार आहे. तसेच मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर बुधवारी (दि.२०) रात्री याच तीन ठिकाणी मतदान यंत्रे जमा केली जाणार आहेत. ही प्रक्रिया सुरळीत पार पडण्यासाठी या तीनही ठिकाणच्या परिसरातील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. हा बदल मंगळवारी (दि.१९) पहाटे पाच ते बुधवारी (दि.२०) रात्री बारापर्यंत अथवा मतदान यंत्र जमा होईपर्यंत असणार आहे.
पिंपरी विधानसभेसाठी चिंचवडमधील ऑटो क्लस्टर येथे अधिकारी, कर्मचाऱ्यांना मतदान साहित्याचे वाटप केले जाणार आहे. चिंचवड विधानसभेचे साहित्य वाटप थेरगावमधील पिंपरी-चिंचवड महापालिका कामगार भवन येथे करण्यात येणार आहे. तर भोसरी विधानसभेचे साहित्य वाटप चिखली, घरकुल येथील ईडब्लुएस हॉल येथे होणार आहे. त्यामुळे खालील प्रमाणे वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत.
# थेरगाव परिसरातील बदल
– तापकीर चौक येथून थेरगावकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद.
– या मार्गावरील वाहने काळेवाडी रस्त्याने काळेवाडी फाटा मार्गे इच्छित स्थळी जातील.
– काळेवाडी पोलिस ठाणे येथून तापकीर चौकाकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद.
– तेथील वाहने काळेवाडी पोलिस ठाणे येथून उजवीकडे वळून पाण्याची टाकी मार्गे इच्छित स्थळी जातील.
– माध्यमिक विद्यालय थेरगाव चौकातून तापकीर चौकाकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांस प्रवेश बंद.
– ही वाहने माध्यमिक विद्यालय थेरगाव समोरील चौकातून उजवीकडे वळून ग प्रभागच्या रस्त्याने इच्छित स्थळी जातील.
# चिखली परिसरातील बदल
– स्वामी विवेकानंद भुयारी भुयारी मार्गाकडून घरकुल चौक ते कुदळवाडी पुलापर्यंत सेवा रस्त्यावरुन सर्व प्रकारच्या वाहनांना ये-जा करण्यास प्रवेश बंद
– तेथील वाहने घरकुल चौकाकडून कृष्णानगर चौकाकडे जाणाऱ्या मुख्य व सेवा रस्ता मार्गे कृष्णानगर चौकात येऊन इच्छितस्थळी जातील.
# ऑटो क्लस्टर भागातील बदल
– मोरवाडीतील जुने न्यायालय, ऑटो क्लस्टर, मोरवाडी, बसवेश्वर चौकाकडे जाणाऱ्या वाहनांना प्रवेश बंद
– मोरवाडी चौकाकडून येणारी वाहने पुढे सरळ केएसबी चौक मार्गे इच्छित स्थळी जातील.
– अंबिका वजन काट्यापासून ऑटो क्लस्टर, मोरवाडी, बसवेश्वर चौकाकडे जाणाऱ्या वाहनांस प्रवेश बंद
– मोरवाडी चौकाकडून येणारी वाहने पुढे सरळ केएसबी चौक मार्गे इच्छित स्थळी जातील.
– महात्मा बसवेश्वर चौकाकडून मोरवाडी जुने न्यायालय, ऑटो क्लस्टर, मोरवाडीकडे प्रवेश बंद
– केएसबी चौक व मोहननगरकडून येणारी वाहने पुढे सरळ महावीर चौक मार्गे इच्छित स्थळी जातील
– आयुक्त बंगल्यापासून ५० मीटर अंतराच्या पुढे ऑटो क्लस्टर, बसवेश्वर चौकाकडे सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद.
– केएसबी चौकाकडून येणारी वाहने पुढे सरळ जुन्या न्यायालया मार्गे मोरवाडी चौकातून इच्छित स्थळी जातील.






















Join Our Whatsapp Group