भोसरी (Pclive7.com):- भोसरी विधानसभेत महायुतीचे उमेदवार महेश लांडगे यांनी भोसरी येथील सावित्रीबाई फुले शाळा येथे आपल्या मतदानाचा हक्क बजावला.
भोसरी विधानसभेत महायुतीचे महेश लांडगे आणि महाविकास आघाडीचे अजित गव्हाणे यांच्यात थेट लढत होत आहे. महाराष्ट्र बळकट व्हावा, याकरिता जास्तीत जास्त नागरिकांनी मतदान करून लोकशाही बळकट करावी असे आवाहन महेश लांडगे यांनी यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना केले.