पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी कॅम्प येथील
साई चौकातील कपड्याचे दुकान फोडून चोरट्यांनी पाच लाख ६८ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना बुधवारी (दि.२७) सकाळी उघडकीस आली. महेंद्रकुमार हडमत सिंह (रा. निगडी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
फिर्यादी महेंद्रकुमार यांनी त्यांचे महालक्ष्मी क्रिएशन नावाचे रेडीमेड कपड्याचे दुकान कुलूप लावून बंद केले. २५ नोव्हेंबर ते २७ नोव्हेंबर या कालावधीत दुकान बंद असताना अज्ञात चोरट्याने दुकानाचे शटर उचकटून आत प्रवेश केला. दुकानातून रोख रक्कम, कपडे, सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे डीव्हीआर मशीन असा एकूण पाच लाख ६८ हजार ५९० रुपयांचा ऐवज चोरून नेला. त्यानंतर महेंद्रकुमार यांच्या दुकाना शेजारील साई क्रिएशन दुकानातील डीव्हीआर देखील चोरट्यांनी चोरून नेला.