चिंचवड (Pclive7.com):- प्रेरणा, निष्ठा, सामर्थ्य, सेवाभाव आणि दातृत्वाचे प्रतिक लोकनेते लक्ष्मणभाऊ जगताप “शक्तिस्थळ”चे भूमिपूजन समारंभ केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या शुभहस्ते होणार आहे. हा भूमिपूजन समारंभ शनिवार दि.११ जानेवारी २०२५ सकाळी ०९ वाजता मारुती मंदिराजवळ, पिंपळे गुरव गावठाण येथे पार पडणार आहे.

यावेळी खासदार श्रीरंग बारणे, पुणे शिक्षण मंडळाचे माजी उपाध्यक्ष विजय उर्फ आप्पा रेणुसे, आमदार महेश लांडगे, अण्णा बनसोडे, सुनील शेळके, शंकर मांडेकर, उमाताई खापरे, अमित गोरखे यांच्यासह सर्वच राजकीय पक्षातील प्रमुख मान्यवर उपस्थित राहणार आहेत.






















Join Our Whatsapp Group