मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी संतोष याच्याकडून फिर्यादी यांनी सहा लाख रुपये दरमहा १० टक्के व्याजाने घेतले होते. महिला आरोपीकडून दोन लाख रुपये १० टक्के दरमहा व्याजाने घेतले होते. आरोपी जावेद खान यांच्याकडून चार लाख रुपये व्याजाने घेतले होते. त्याबदल्यात आरोपी संतोष त्याच्या मुद्दल रकमेची परतफेड करून ९ लाख ५० हजार रुपये दिले होते. तसेच फिर्यादी यांच्या नावावर असलेली एक एकर जमीनहीं लिहून दिली होती. महिला आरोपीला दरमहा २० हजार रुपये देऊन स्वताच्या मालकीची २० गुंठे जमीन लिहून दिली होती, तरी देखील महिला आरोपीने १४ लाख रुपये दिल्याशिवाय जमीन परत देणार नाही, असा तगादा लावला.
आरोपी जावेद खान यांनी दिलेल्या कर्जापोटी व्याज म्हणून ४ लाख ५० हजार रुपये त्याला दिले. तर आरोपी संतोष पवार याच्याकडूनही साडेसात लाख रुपये घेतले होते व त्यापैकी बहुतांश रक्कम परत दिली होती. तरी देखील आरोपींनी व्याजाचे पैसे देण्यासाठी तगादा लावला. फिर्यादी वैभव हांडे यांना शिवीगाळ व दमदाटी करून त्यांचा शारीरिक व मानसिक छळ केला. शेवटी या त्रासाला कंटाळून हांडे कुटुंबाने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. फिर्यादी यांनी त्यांच्या १४ वर्षीय मुलाला मुंबईतील नातेवाइकांकडे पाठविले होते. आत्महत्या करताना फिर्यादी त्यांची पत्नी व लहान मुलगा घरी होते. त्यांनी त्यांच्याच मेडिकलमधून झोपेच्या गोळ्या आणल्या व खाल्ल्या. तसेच तिघांनीही छताच्या पंख्याला गळफास घेतला, या घटनेत पत्नी शुभांगी व लहान मुलगा धनराज यांचा मृत्यू झाला.
आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी मुंबईतील नातेवाइकांकडे असलेल्या मोठ्या मुलाच्या मोबाइलवर सुसाइड नोट पाठविली होती. रात्री मुलाने ही सुसाइड नोट पाहिली असता त्यांनी आपल्या पालकांना फोन केला. मात्र त्यांनी फोन उचलला नाही. त्यामुळे त्याने शेजाऱ्यांना केला. त्यांनी दरवाजा वाजवूनही प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी रात्री पोलिसांना पाचारण केले.
घटनेची माहिती मिळताच चिखली पोलीस घटनास्थळी दाखल झाले. फिर्यादी वैभव है जिवंत असल्याचे दिसून येताच त्यांनी त्वरीत त्यांना जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल केल्याने त्यांचे प्राण वाचले, चिखली पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.






















Join Our Whatsapp Group