मुंबई (Pclive7.com):- महायुतीचं सरकार स्थापन झाल्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार आणि खातेवाटप होऊन एक महिन्यापेक्षा जास्त कालावधी झाल्यानंतर अखेर आज (१८ जानेवारी) पालकमंत्र्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गडचिरोली जिल्ह्याचं पालकमंत्रिपद असणार आहे. तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे ठाणे आणि मुंबई शहरचं पालकमंत्रिपद असणार आहेत. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पुणे जिल्हा आणि बीड जिल्ह्याचं पालकमंत्रिपद देण्यात आलं आहे. मंत्री धनंजय मुंडे यांना या पालकमंत्रिपदाच्या यादीतून वगळण्यात आलं आहे. आता बीडचे पालकमंत्री अजित पवार असणार आहेत. तसेच धनंजय मुंडे यांना कोणत्याही जिल्ह्याचं पालकमंत्रिपद देण्यात आलेलं नाही. त्यामुळे त्यांच्यासाठी हा धक्का मानला जात आहे.
पालकमंत्र्यांची संपूर्ण यादी
- गडचिरोली – देवेंद्र फडणवीस
- नागपूर – चंद्रशेखर बावनकुळे
- ठाणे – एकनाथ शिंदे
- पुणे – अजित पवार
- बीड – अजित पवार
- सिंधुदुर्ग- नितेश राणे
- अमरावती – चंद्रशेखर बावनकुळे
- अहिल्यानगर – राधाकृष्ण विखे पाटील
- वाशिम – हसन मुश्रीफ
- सांगली – चंद्रकांत पाटील
- सातारा -शंभुराजे देसाई
- छत्रपती संभाजी नगर – संजय शिरसाट
- जळगाव – गुलाबराव पाटील
- यवतमाळ – संजय राठोड
- कोल्हापूर – प्रकाश आबिटकर, सह पालकमंत्री माधुरी मिसाळ
- अकोला – आकाश फुंडकर
- भंडारा – संजय सावकारे
- बुलढाणा – मकरंद जाधव
- चंद्रपूर – अशोक ऊईके
- धाराशीव – प्रताप सरनाईक
- धुळे – जयकुमार रावल
- गोंदिया – बाबासाहेब पाटील
- हिंगोली – नरहरी झिरवळ
- लातूर – शिवेंद्रसिंग भोसले
- मुंबई शहर – एकनाथ शिंदे
- मुंबई उपनगर -आशिष शेलार/ सह पालकमंत्री मंगलप्रभात लोढा
- नांदेड – अतुल सावे
- नंदुरबार – माणिकराव कोकाटे
- नाशिक – गिरीष महाजन
- पालघर – गणेश नाईक
- परभणी – मेघना बोर्डीकर
- रायगड – अदिती तटकरे
- सिंधुदुर्ग- नितेश राणे
- रत्नागिरी – उदय सामंत
- सोलापूर – जयकुमार गोरे
- वर्धा – पंकज भोयर
- जालना – पंकजा मुंडे






















Join Our Whatsapp Group