पिंपरी (Pclive7.com):- लाईट हाऊस फाउंडेशनचे कार्य युवकांचे भवितव्य घडविणारे असल्याचे वक्तव्य पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माजी उपमहापौर हिरानंद उर्फ डब्बू आसवानी यांनी केले. पिंपरी चिंचवड महानगरपालिका व लाईट हाऊस कम्युनिटीज फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने युवकांना आपले करिअर घडविण्यासाठी विविध क्षेत्रातील प्रशिक्षण उपलब्ध करून देत रोजगार देण्याचे कार्य कौशल्यम लाईट हाऊस या उपक्रमाअंतर्गत होत आहे. सदर उपक्रम पिंपरी चिंचवड शहरात मोठ्या प्रमाणात राबविण्यात येत आहे. या उपक्रमामध्ये ज्या युवकांनी प्रशिक्षण घेतले त्या युवकांना प्रमाणपत्र देण्यात येते या प्रमाणपत्र प्रदान कार्यक्रमास माजी महापौर हिरानंद उर्फ डब्बू अस्वानी यांनी आपली प्रमुख उपस्थिती दर्शविली. या वेळी ते बोलत होते.
यावेळी डब्बू आसवानी म्हणाले की, पिंपरी चिंचवड शहरातील युवक-युवतींसाठी अतिशय चांगल्या प्रकारे लाईट हाऊस फाउंडेशन काम करत आहे. १६ ते ३५ वयोगटातील विद्यार्थ्यांना १६ विविध मोफत कोर्सेस या ठिकाणी शिकविले जातात. तसेच सदर कोर्स कालावधी हा २२ दिवसांचा असून या कालावधीमध्ये व्यक्तिमत्व विकास, कार्यशाळा फाउंडेशन कोर्स, स्पोकन इंग्लिश, डिजिटल एमपॉवरमेंट, याविषयी मार्गदर्शन केले जाते. २२ दिवसानंतर मुलांना करियर कौन्सिलिंग केले जाते. त्यानंतर त्यांच्या आवडत्या स्किलनुसार त्यांना कोर्सची संधी दिली जाते व त्यानंतर नोकरी व्यवसायाची व त्याविषयी मार्गदर्शन अशा प्रकारे लाईट हाऊस फाउंडेशन कार्य करत आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवड शहरातील मुलांच्या उज्वल भविष्याच्या दृष्टीने सदर उपक्रम महत्त्वाची कामगिरी बजावत असल्याचे डब्बू आसवानी यांनी सांगितले. तसेच लाईट हाऊस फाउंडेशनच्या पुढील वाटचालीस त्यांनी शुभेच्छा दिल्या.या वेळी लाईट हाऊस फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी शिक्षक व प्रशिक्षण घेणारे अनेक विद्यार्थी उपस्थित होते.





















Join Our Whatsapp Group