पिंपळे सौदागर (Pclive7.com):- पिंपळे सौदागर मधील शिवार गार्डन चौक येथे एका कपड्याच्या दुकानाला आणि डेंटल क्लिनिकला भीषण आग लागली. ही घटना सोमवारी (दि.२७) पहाटे पावणेदोन वाजताच्या सुमारास घडली.
अग्निशमन दलाच्या सूत्रांनी दिलेले माहितीनुसार, पिंपळे सौदागर मधील शिवार गार्डन चौकातील एका कपड्याच्या दुकानाला आणि डेंटल क्लिनिकला आग लागली. घटनेची वर्दी पहाटे पावणेदोन वाजताच्या सुमारास अग्निशमन विभागाला मिळाली. त्यानंतर पिंपरी चिंचवड अग्निशमन विभागाचे दहा बंब घटनास्थळी दाखल झाले. आगीवर पाणी मारून आग आटोक्यात आणली.
कपड्याच्या दुकानातील कपडे, फर्निचर, इलेक्ट्रिक साहित्य आणि डेंटल क्लिनिक मधील डेंटल खुर्ची, इलेक्ट्रिक साहित्य आणि फर्निचर जळाले आहे. यामध्ये सुमारे एक कोटी १५ लाखांचे नुकसान झाले आहे, अशी माहिती मिळत आहे. सुदैवाने आगीत कोणीही जखमी झाले नाही. आगीचे कारण समजू शकले नाही.






















Join Our Whatsapp Group