पिंपरी (Pclive7.com):- आकुर्डी येथील एका झेरॉक्सच्या दुकानाला भीषण आग लागली. ही घटना सोमवारी (दि.२७) दुपारी दोन वाजताच्या सुमारास घडली. अग्निशामक दलाचे तीन बंब आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न करीत आहेत.
आकुर्डी येथील एका मॉलच्या जवळ असलेल्या झेरॉक्सच्या दुकानाला आग लागल्याची माहिती सोमवारी दुपारी १.५७ वाजता अग्निशामक दलास मिळाली. यानुसार प्राधिकरण उपअग्निशामक केंद्रातील एक बंब तसेच अग्निशामक मुख्यालयातील दोन बंब घटनास्थळी दाखल झाले आहेत. आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
मात्र बघ्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याने अग्निशामक दलाच्या कर्तव्यात अडचण निर्माण होत आहे. घटनास्थळी पोलिसही दाखल झाले आहेत.






















Join Our Whatsapp Group