पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाने चिखली येथे अवैध गॅस रिफिलिंग प्रकरणी मोठी कारवाई केली. या कारवाईमध्ये १२६ सिलेंडरसह ८ लाख ३२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. याप्रकरणी शशिकांत शंकर भांगरे (वय ४३, रा. चिखली), सागर सूर्यकांत मिरगाजी (वय २६, रा. चिखली), अमर महादेव साठे (वय २९, रा. चिखली), योगेश गंगाधर गुंडले (वय १९, रा. चिखली) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलीस उपायुक्त संदीप डोईफोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पवार वस्ती कुदळवाडी येथे अवैधरित्या गॅस रिफिलिंग सुरु असल्याची माहिती मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाला माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी छापा मारून कारवाई केली. भरलेल्या गॅस सिलेंडर मधून रिकाम्या गॅस सिलेंडरमध्ये नोझलच्या साहाय्याने गॅस रिफील करत असल्याचे आढळून आले. या कारवाईमध्ये १२६ गॅस सिलेंडर व दोन टेम्पो असा एकूण आठ लाख ३२ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता.
सदरची कामगिरी ही मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ, सहा पोलीस निरीक्षक अभिनय पवार, पोलीस उप निरीक्षक भरत गोसावी, पोलीस अंमलदार महेश खांडे, गणेश हिंगे, आशिष बनकर, नितीन लोखंडे, सोमनाथ मोरे, पोलीस शिपाई विनोद वीर, समीर रासकर, अमर कदम, अमोल गोरे, मोहसीन आत्तार, यांनी केली आहे.






















Join Our Whatsapp Group