पिंपरी (Pclive7.com):- हिंजवडी येथे तीन मित्रांनी मिळून एका मित्राला कपडे काढायला भाग पाडले व त्याचे नग्नावस्थेतील व्हिडीओ बनवून ते सोशल मीडियावर व्हायरल केले. याप्रकरणी हिंजवडी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.

श्रेयस संजय कवडे (वय १९, हिंजवडी. मूळ रा. धाराशिव), ललित प्रमोद भदाने (वय २१, हिंजवडी, मूळ रा. धुळे), राम तुळशीराम गंभीरे (वय ३५, हडपसर, पुणे मूळ रा. लातूर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी २० वर्षीय पीडित तरुणाने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पीडित तरुण, आरोपी श्रेयस आणि ललित हे तिघे ताथवडे येथील एका शिक्षण संस्थेत शिकत आहेत, श्रेयसने पीडित तरुणाला मारुंजी रोड येथील एका सोसायटी मधील फ्लॅटवर बोलावून घेतले. तिथे राम गंभीर याने पीडित तरुणाला सिगारेट दिली. ती सिगारेट तरुणाकडून खाली पडली. पीडित तरुणाने सिगारेट उचलून अॅश ट्रेवर ठेवली. त्यावरून राम गंभीर याने पीडित तरुणाला मारहाण केली. तरुणाला कपडे काढण्यास सांगितले. विचित्र प्रकार करण्यास भाग पाडले. दरम्यान ललित याने या प्रकरणाचा व्हिडीओ बनवून तो सोशल मीडियावर व्हायरल केला. आरोपी राम गंभीरे याने पीडित तरुणाला ‘माझ्यावर ५३ केसेस आहेत. माझे कोणी काहीही बिघडू शकत नाही’ अशी धमकी दिली.
तक्रारदार आणि आरोपी दोन मुले एकाच महाविद्यालयात शिकतात. तर गंभीरे हा एकाचा नातेवाईक आहे. घटना उघडकीस आल्यानंतर हिंजवडी पोलिसांनी तात्काळ तीनही आरोर्पीना अटक केली आहे, पुढील तपास सुरु आहे.– विशाल गायकवाड, पोलीस उपायुक्त






















Join Our Whatsapp Group