पिंपरी (Pclive7.com):- दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने १३ जणांनी मिळून एका तरुणावर कोयत्याने वार करत गंभीर जखमी केले. ही घटना रविवारी (दि.९) रात्री आठ वाजता ज्योतिबानगर, काळेवाडी येथे घडली. सचिन विश्वनाथ तेझाड (२४, रा. काळेवाडी) असे जखमी तरुणाचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी काळेवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, ऋषिकेश मुरुड, शंकर मुरुड, विकी सिंग, मंगेश कांबळे, संदेश सूर्यवंशी, साळवी, रितेश साळवे, नॉडी आणि इतर चार ते पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सचिन हे ज्योतिबानगर येथील मैदानाजवळ थांबले होते. त्या वेळी आरोपी ऋषिकेश तिथे आला. त्याने दारू पिण्यासाठी सचिन यांच्याकडे पैसे मागितले. सचिन यांनी पैसे न दिल्याने ऋषिकेश आणि त्याच्या साथीदारांनी मिळून सचिन यांच्यावर कोयत्याने वार केले. तसेच लाकडी दांडक्याने मारत गंभीर जखमी केले. काळेवाडी पोलिस तपास करीत आहेत.





















Join Our Whatsapp Group