पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड पोलिसांच्या मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाने पुणे- मुंबई एक्सप्रेस वे वरील उर्से टोल नाक्याजवळ काल सायंकाळी रक्तचंदनाची तस्करी करणारा एक कंटेनर पकडला आहे. रक्तचंदनाची अवैधरित्या वाहतुक करणाऱ्या दोन जणांना ताब्यात घेऊन सुमारे ९ कोटी रुपये किमतीचे रक्तचंदनाच्या लाकडाचे ओंडके मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाकडुन जप्त करण्यात आले असून राजाराम गंगाराम गायखे (वय ३७ वर्षे रा. काळेवाडी, ता. पारनेर, जि. अहिल्यानगर), हरप्रितसिंग धरमसिंग बदाना (वय ४२ वर्षे रा. विराज रेसिडेन्सी वेस्ट ठाणे) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
गुन्हे शाखेचे पोलिस उप आयुक्त संदीप डोईफोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, (दि.०२) रोजी मालमत्ता गुन्हे विरोधी पथकातील अधिकारी व अंमलदार हे पिंपरी चिचवड आयुक्तलाच्या हद्दीमध्ये पेट्रोलिंग करत असताना सहायक पोलीस फौजदार महेश खांडे व पोलीस हवालदार नितीन लोखंडे यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, पुणे मुबंई एक्सप्रेस वे वरती एमएच/४३/वाय/०७४२ या कंटेनरमध्ये अवैधरित्या मालाची वाहतुक होत आहे. त्यानंतर मालमत्ता विरोधी पथकाच्या टीमने पुणे मुबंई एक्सप्रेस वे वर शिरगाव परंदवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत जुना ऊर्से टोलनाक्या जवळ सापळा रचुन शिताफिने एमएच/४३/वाय/०७४२ हा कंटेनर ताब्यात घेतला. यावेळी कंटेनरमध्ये ११ टन ४९० किलोग्रॅम वजनाचे ८ कोटी ६१ लाख ७५ हजार रुपये किंमतीचे रक्तचंदनाच्या लाकडांचे ओडके मिळून आले.
सदर उल्लेखनीय कामगिरी ही पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, पोलीस सह आयुक्त शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उप-आयुक्त गुन्हे संदीप डोईफोडे, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे १ डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ, पोलीस उप निरीक्षक भरत गोसावी, पोलीस अंमलदार महेश खांडे, आशिष बनकर, नितीन लोखंडे, पोलीस हवालदार गडदे, पोलीस नाईक गणेश कोकणे, अमर कदम, हर्षद कदम, अमोल गोरे, मोहसीन आत्तार यांनी केली आहे.






















Join Our Whatsapp Group