पिंपरी (Pclive7.com):- शुक्ल यजुवेदिय आप्तस्वकीय ब्राह्मण संस्थेचा स्नेहमीलनाचा सोहळा काळेवाडी येथील बालाजी लान्स येथे दिमाखात संपन्न झाला. यावेळी अमृत संस्थेचे विजय जोशी यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती.
शुक्ल यजुवेदिय आप्तस्वकीय ब्राह्मण संस्थेत प्रामुख्याने खांदेशातुन येऊन पुण्यात स्थायिक झालेले सर्व सभासद आहेत. यात संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मधुकर कुलकर्णी हे सर्व आप्तस्वकी्यांना एकत्र आणण्याचे तसेच विविध समाज उपयोगी उपक्रम गेल्या ३५ वर्षांपासून अविरत कार्य करीत आहे. या स्नेहमीलनाच्या कार्यक्रमात पुण्यातील सुप्रसिद्ध युवा उद्योजक आणि विशेष प्रविण्य मिळविणारे जितेंद्र जोशी, हितेश उपाध्ये, शरद जोशी, सुभाष पाठक, शरद मुळे आणि सारिका पाठक यांचा सत्कार कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे विजय जोशी यांनी केला.
तसेच ह्या कार्यक्रमात संस्थेतर्फे समाजास उपयोगात येईल अशा स्मरणीकेचे प्रकाशन हे विजय जोशी तसेच संस्थेचे सर्व पदाधीकारी आणि सदस्य असलेले मधुकर कुलकर्णी, प्रकाश कुलकर्णी, शरद जोशी, रमेश भट, बी. डी. कुलकर्णी, हितेश उपाध्ये, मृणाल उपाध्ये, प्रमोद भट, अंकलेश्वर भट, संजय कुलकर्णी, सुनील कुलकर्णी, अरविंद कुलकर्णी, रवींद्र पाठक यांच्या हस्ते झाले. तसेच विजय जोशी यांनी सर्वांचे अभिनंदन केले.
ह्या नयनरम्य सोहळ्याची सुरुवात राष्ट्रगाणाने होऊन दिपप्रज्वलन, भगवान परशुराम आणि सरस्वती मातेचे पूजन करुन शांतिपाट, ईशस्तवन झाले. विजय जोशी यांनी अमृत संस्थेचे असलेले विविध उपक्रम यांची मोलाची माहिती दिली. तसेच यावेळी ७५ पेक्षा जास्त वय असलेल्या ज्येष्ठांचा आणि भगिनींचा सन्मान करण्यात आला. बी. डी. कुलकर्णी यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितले कि, खांदेशातील काही मंडळी पुण्यात स्थायिक झाली आहे आणि आज ह्या कार्यक्रमात उपस्थित आहेत, म्हणजे खऱ्या अर्थाने आज सातपुडा सह्याद्रीमध्ये विलीन झालेला दिसत आहे. खांदेशातील तापी पांजारेचा पुण्यातील मुळा-मुठा -इंद्रायणीशी संगम झालेला दिसत आहे.
यावेळी उपस्थित २०० च्या वर सभासदांनी स्वादिष्ट खान्देशी जेवणाचा स्वाद घेत विविध मनोरंजनाच्या कार्यक्रमाचा देखील आस्वाद घेतला. झालेल्या कार्यक्रमात बालाजी लान्सचे मल्लेश कद्रापूरकर आणि बाळासाहेब करंजुले याचे विशेष सहकार्य लाभले. शेवटी अरविंद कुलकर्णी यांनी आभार प्रदर्शन करुन सर्वांनी पसायदान म्हणून ह्या दिमाखदार सोहळ्याची सांगता झाली.






















Join Our Whatsapp Group