पिंपरी (Pclive7.com):- शिवसेनेच्या उपजिल्हा प्रमुखावर चाकू उगारून जिवे मारण्याची धमकी देण्यात आली. पिंपरी येथील संत तुकारामनगरमध्ये शुक्रवारी (दि.२१) दुपारी सव्वाबाराला ही घटना घडली. राजेश वाबळे (५०, रा. संत तुकारामनगर, पिंपरी) यांनी याप्रकरणी संत तुकारामनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शशिकांत मधुकर भालेराव (५५) यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

फिर्यादी राजेश वाबळे हे शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे उपजिल्हाप्रमुख आहेत. संत तुकारामनगर येथे वाबळे यांच्या शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाचे बांधकाम होत असल्याने तेथे ते गेले. त्यावेळी भालेकर हा वाबळे यांच्या पाठीमागून आला. भालेकर याने त्याच्या हातात असलेला चाकू त्यांच्यावर उगारला. तेव्हा त्यांच्यासोबत असलेला कामगार जोरात ओरडला. तसेच त्यावेळी भालेकर याचे वडील तेथे आले. त्यांनी शशिकांतला तेथून दूर नेले. मी शिक्षा भोगून आलो आहे. माझा बाप जिवंत आहे, तोपर्यंत तू आहे. माझा बाप गेला की मी तुझा गेम करतो, अशी धमकी भालेकर याने दिली. त्यानंतर त्याचे वडील त्याला घेऊन गेले.
याप्रकरणी शशिकांत भालेकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक गाडेकर हे पुढील तपास करीत आहेत.
























Join Our Whatsapp Group