आमदार महेश लांडगे यांचे भाषण गाजले; ‘सोशल मीडिया’वर हिंदुत्ववाद्यांचा धुरळा
पिंपरी (Pclive7.com):- ‘देश की रक्षा कौन करेगा..’, जय श्रीराम.. जय शिवराय… अशा गगनभेदी घोषणा देत ‘‘हिंदू माता-भगिनींकडे वाकड्या नजरेने बघणाऱ्या प्रवृत्ती या पुढील काळात मान खाली घालून गेल्या पाहिजेत. असा हिंदूत्त्वाचा आवाज करारा पाहिजे, असा हुँकार प्रखर हिंदत्त्वाचा पुरस्कार करणारे भाजपाचे आमदार महेश लांडगे दिली. पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी शोभायात्रा म्हणून ‘सोशल मीडिया’वर हिंदूत्त्ववादी तरुणांनी धुरळा उडवून दिला आहे.
हिंदू नववर्ष गुढीपाडवा या निमित्ताने विश्व हिंदू परिषद, बजरंग दल प्रखड व सर्व सलग्न संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या हिंदू नववर्ष शोभा यात्रेचे आयोजन मंचर तालुका आंबेगाव येथे करण्यात आले होते. या शोभा यात्रेस सुमारे 30 हजार हिंदू बांधव आणि भगिनींनी सहभाग घेतला. या शोभायात्रेत आमदार लांडगे यांना निमंत्रित केले होते.
मंचर येथील बाजारपेठेतील श्रीराम मंदिर येथून शोभायात्रेला सुरूवात करण्यात आली. महाआरती करुन शोभायात्रेने प्रस्थान केले. या शोभायात्रेचे यंदा २१ वे वर्ष आहे. परंपरेनुसार ध्वज पूजन, शस्त्र पूजा करून शोभा यात्रेला सुरुवात करण्यात आली. चावडी चौक, धर्मवीर संभाजी महाराज चौक, पिंपळगाव फाटा, धर्मवीर चंद्रशेखर आण्णा बाणखेले मार्गावरुन छत्रपती शिवाजी महाराज चौकात यात्रेचा समारोप करण्यात आला. विश्व हिंदू परिषद मंचर प्रखंड मंत्री अक्षय जगदाळे, बजरंग दल मंचर प्रखंड संयोजक सागर भोर आणि सहकाऱ्यांनी शोभायात्रेच्या यशस्वीतेसाठी पुढाकार घेतला.
शोभायात्रेमध्ये घोड्यावर विराजमान त्यावर विराजमान छत्रपती श्री शिवाजी महाराज, मावळे सगळ्यांचे लक्ष वेधून घेत होते. हिंदू धर्मात सर्वात आधी पूजेचा मान असणाऱ्या श्री गणरायाचा चित्ररथ, भगवान शंकराचा नंदीवर विराजमान चित्ररथ होते तर छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती मूर्ती आणि संविधान चित्ररथ बालवानर सेना, बजरंग बलीची पूर्णाकृती मूर्ती, धर्मवीर चंद्रशेखर आण्णाचा स्मृतिरथ विशेष लक्षणीय होता.
योगी शंकराची भव्य मूर्ती, अयोध्यातील प्रभू श्रीराम मूर्ती, श्रीरामभक्त हनुमान मूर्ती यासह छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज यांचे चित्ररथ आणि त्यावर केलेले विद्युत रोषणाई आणि त्या मूर्ती समोरून नृत्य करत सर्वांसाठी आकर्षणाचा विषय ठरले. या शोभायात्रेत ठिकठिकाणी मर्दानी खेळ आकर्षण ठरले.
विश्व हिंदू परिषद, बजरंग दल मंचर प्रखंड आणि हिंदूत्त्ववादी संघटनाच्या माध्यमातून अभूतपूर्व अशी शोभायात्रा, रथयात्रा काढण्यात आली. तरुणांचा प्रचंड उत्साह आणि ऊर्जा अलौकीक पहायला मिळाली. देव-देश-धर्म रक्षणाचा विचार तरुण पिढीमध्ये रुजला पाहिजे. आधुनिक युगाशी स्पर्धा करताना आपली भारतीय संस्कृती- परंपरा याचेही जतन झाले पाहिजे. गुढी पाडव्याच्या निमित्ताने झालेली शोभायात्रा संस्मरणीय आणि नवी ऊर्जा देणारी आहे.
– महेश लांडगे, आमदार, भाेसरी विधानसा, भाजपा, पिंपरी-चिंचवड, पुणे.