भोसरी (Pclive7.com):- मोशी येथील भारतमाता चौकाजवळील खिरीड वस्ती येथे लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन दोन मित्रांनी आत्महत्या केली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

पोलीस उपायुक्त शिवाजी पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, एमआयडीसी भोसरी पोलीस स्टेशनच्या हद्दीत भारतमाता चौकाजवळील खिरीड वस्ती, मोशी या ठिकाणी एका लिंबाच्या झाडाच्या एकाच फांदीला दोन जणांनी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

तुषार अशोक ढगे (वय २५ वर्ष रा. हुंडा पिंपळगाव ता. जामखेड जि. अहिल्यानगर), सिकंदर सल्लाउद्दीन शेख (वय ३० वर्ष रा. हुंडा पिंपळगाव ता. जामखेड जि. अहिल्यानगर) अशी गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या तरुणांची नावे आहेत.
प्राथमिक माहितीनुसार हे दोघे एकमेकांचे मित्र असून काल मूळ गावावरून पुण्याला आले होते. परंतु नेमकं कोणत्या कारणामुळे दोघांनी आत्महत्या केली याची माहिती मिळाली नसून अधिक तपास भोसरी एमआयडीसी पोलीस करत आहेत.






















Join Our Whatsapp Group