पिंपरी (Pclive7.com):- पिंपळे निलख येथील १३ वर्षीय शौर्या गणेश इंगवले (वय १३) हिने इंटरनॅशनल स्पोर्ट्स फेडरेशन आयोजित वर्ल्ड स्कूल जिम्नॅसियाड (१५ वर्षे आतील) या स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करताना फाॅयल फेंसिंग प्रकारात उत्कृष्ट कामगिरी केली आहे. ही स्पर्धा झाल्टिबोर, सर्बिया (युरोप) येथे ०४ – १४ एप्रिल २०२५ रोजी पार पडली.

शौर्याने क्वार्टर फायनलमध्ये ब्राझीलच्या प्रतिस्पर्ध्याचा १५-८ अशा गुणांनी पराभव करत, या प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारतासाठी पहिले ब्राँझ पदक मिळवले. ही कामगिरी शालेय स्तरावरील आंतरराष्ट्रीय फेंसिंगमध्ये भारतासाठी एक ऐतिहासिक क्षण ठरली आहे.
शौर्या ही रवींद्रनाथ टागोर स्कूल ऑफ एक्सलन्स, भारती विद्यापीठ (बालेवाडी) येथील विद्यार्थीनी असून, ती इन गार्ड फेंसिंग अकादमी येथे नियमित सराव करते. तिच्या या यशात मार्गदर्शन करणाऱ्या श्वेता आव्हाड मॅडम (मुख्य प्रशिक्षक), बोम्मयी सर आणि विक्टर सर यांनी शौर्याला कठोर सराव व योग्य दिशादर्शन दिले.

या आधी, शौर्याने नोव्हेंबर २०२४ मध्ये जम्मू येथे झालेल्या नॅशनल स्कूल गेम्समध्ये सिल्व्हर पदक पटकावले होते. शौर्याची ही प्रेरणादायी वाटचाल भविष्यात भारताला आंतरराष्ट्रीय पातळीवर आणखी गौरव मिळवून देईल विश्वास व्यक्त केला जात आहे.






















Join Our Whatsapp Group