सातारा (Pclive7.com):- एका युवकाने यूट्यूब च्या माध्यमातून एक सिनेमा बनवला आणि तो सिनेमा आज चित्रपटातील सर्वात मानांकित असलेल्या कान्स फिल्म फेस्टिवल मध्ये वर्ल्ड प्रीमियर झाला आहे. सिनेमा बनवायला शिकण्यासाठी किमान 8 ते 10 वर्ष लागतात पण या युवकाने यूट्यूबच्या माध्यमातून सिनेमा बनवला आहे.

हा युवक दुसरा तिसरा कोणी नसून आपल्या साताराचा दिलीप वासुदेव आहे. दिलीप याने ना कुठला कोर्स केला, ना कोणत्या डायरेक्टर च्या हाताखाली काम केले. फक्त आणि फक्त यूट्यूब च्या माध्यमातून एक हायडोस कर्मा इज बीच हा हिंदी सिनेमा बनवला आणि तो आज कान्स फिल्म फेस्टिवल मध्ये वर्ल्ड प्रीमियर म्हणून 16 मे 2025 रोजी भारतीय वेळेनुसार सायंकाळी 5 वाजता प्रदर्शित झाला आहे.
78 वर्षाच्या कान्स च्या इतिहासामध्ये यूट्यूब च्या मदतीने बनविलेला सिनेमा कधीही स्क्रीन झाला नाही ते काम आपल्या दिलीप ने दोन वर्षाच्या अथक परिश्रमातून 2 तास 51 मिनिटाचा सिनेमा बनवला आहे. त्याच्या या कामाचे कौतुक सातारा चे लोकप्रिय खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराज साहेब यांनी केले आहे.

या सिनेमा मध्ये पाच वेगवेगळ्या स्टोरी आहेत आणि त्याच एक सुंदर सादरीकरण म्हणजे सिनेमा “हायडोस…” या सिनेमाला बरेचसे मानांकित फिल्म फेस्टिवल मध्ये अवॉर्ड्स मिळालेले आहेत. त्यामध्ये बेस्ट फिल्म, बेस्ट डेबू डायरेक्टर, बेस्ट स्क्रीनप्ले, ज्युरी मेंशन्ड बेस्ट ऍक्ट्रेस, भारत गौरव पुरस्कार असे विविध पुरस्काराने सन्मानित झालेला हा सिनेमा सध्या कान्स फिल्म फेस्टिवल मध्ये सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
या सिनेमा मध्ये पाच गाणी त्यामध्ये 3 हिंदी, 1 मराठी लोक गीत आणि 1 तमिळ भाषेतील गाणे आहे. हा सर्व प्रवास यूट्यूब च्या माध्यमातून झालेला असून आपल्या सारख्या मराठी माणसाला अभिमान वाटेल असे काम दिलीप ने त्याच्या पहिल्याच सिनेमातून दाखवून दिले आहे. सांगण्याचे तात्पर्य म्हणजे यूट्यूब च्या आधारे असाही सिनेमा कोणी बनवू शकतो हेच बऱ्याच लोकांना पटत नाहीये.
दिलीपने अशक्य गोष्ट शक्य करून आज जगाला दाखवून दिली की या जगात काहीही घडू शकत. आम्ही दिलीपला विचारले की या कामात तुझा गुरू कोण? तर त्यानं उत्तर दिले माझा गुरू यूट्यूब.. दिलीप तुझ्या कार्यास सलाम आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा..!