पिंपरी (Pclive7.com):- शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पिंपरी विधानसभा समन्वयक तसेच मातोश्री सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गणेश आहेर यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपरी येथील जिजामाता हॉस्पिटल येथील रुग्णांना फळे वाटप करून वाढदिवस साजरा करण्यात आला.

गणेश आहेर यांना शहरातील विविध क्षेत्रातील राजकीय तसेच सामाजिक कार्यकर्ते यांच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. गणेश आहेर यांची राजकीय कारकीर्द ही सामाजिक जाणीवेतून सुरुवात झाली असून ते दरवर्षी सामाजिक उपक्रम राबवून आपला जन्मदिवस साजरा करतात.
यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला जिल्हा संघटिका अनिता तुतारे, महिला शहर संघटक रुपाली आल्हाट, महिला जिल्हा समन्वयक सुशीला पवार, विभाग संघटिका सुजाता नखाते, तसलीम शेख, पूनम रेठे, विभाग प्रमुख गोरख पाटील, शाखा प्रमुख नरसिंग माने, भरत इंगळे, अंकुश पवार, बाळासाहेब जम, राजू निकम, बाळासाहेब गायकवाड, दीपक भक्त, कुदळे भाऊ तसेच सर्व शिवसैनिक व मित्र परिवार उपस्थितीत होते.























Join Our Whatsapp Group