पिंपरी (Pclive7.com):- जुन्या भांडणाच्या कारणावरून पाच जणांनी मिळून दोघांवर कोयता, चाकू, लाकडाने हल्ला करत गंभीर जखमी केले. ही घटना शुक्रवारी (६ जून) रात्री पिंपरीतील एच.ए. स्कूल समोर घडली.

अरमान अजीज सय्यद (२२, संत तुकाराम नगर, पिंपरी), अथर्व उर्फ मोन्या गंधुरे अशी जखमींची नावे आहेत. याप्रकरणी अरमान यांनी संत तुकाराम नगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार वसीम शाबीर सय्यद (२६), जावेद शाबीर सय्यद (२७), रोहित कसबे (२७), फरमान सैफी (२४, पिंपरी), लाला पठाण (३०, देहूरोड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अरमान हे त्यांच्या मित्रांसोबत टेबल गेम खेळण्यासाठी एच ए कंपनी कॅम्पस मधील वेल्फेअर सेंटर मध्ये गेले होते. तिथे आलेल्या आरोपींनी जुन्या भांडणाच्या कारणावरून अरमान आणि त्यांच्या मित्रांला कोयता, चाकू, लाकडाने तसेच लाथाबुक्क्यांनी मारून गंभीर जखमी केले.

याप्रकरणी पोलिसांनी जावेद सय्यद, फरमान सैफी या दोघांना अटक केली आहे. पुढील तपास संत तुकाराम नगर पोलीस करत आहेत.






















Join Our Whatsapp Group