पिंपरी (Pclive7.com):- चऱ्होली येथील चोविसावाडी येथे विहिरीतून १७ वर्षीय मुलीचा मृतदेह काढण्यात आला. वैष्णवी संतोष इंगवले (१८, चोविसावाडी) असे मुलीचे नाव आहे.
दिघीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बापू ढेरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, वैष्णवीचे पालक बुधवारी (२५ जून) दुपारी दिघी पोलिस ठाण्यात आले. त्यांनी त्यांची मुलगी बेपत्ता झाली असून, तिची ओढणी विहिरीच्या बाजूला आढळली असल्याचे सांगितले. दिघी पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. ४५ फूट पाणी असलेल्या विहिरीत शोध घेण्यासाठी अग्निशमन विभागाला पाचारण करण्यात आले.

अग्निशमन विभागाचे अधिकारी विकास नाईक, कर्मचारी प्रदीप भिलारे, अमोल चिपळूणकर, नितीन कोकरे यांनी घटनास्थळी धाव घेतली. विहिरीत ४५ फूट पाणी असल्यामुळे अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी अंडर वॉटर कॅमेऱ्याच्या मदतीने मुलीचा शोध घेतला. पाण्यात मुलीचा मृतदेह आढळला.






















Join Our Whatsapp Group