पिंपरी (Pclive7.com):- देहूरोड परिसरातील गांधीनगर भागात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकला. सहा आरोपींना ताब्यात घेत त्यांच्याकडून सहा हजार ७२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई सोमवारी (दि. ७) दुपारी सव्वादोन वाजताच्या सुमारास करण्यात आली.

रमजान मोहम्मद हानिफ शेख (५२, रा. ओटास्किम निगडी), शशिकांत सुभाष मोरे (४३, रा. दत्तनगर, मोहननगर), अनिल छगन अक्कर (७२), प्रेमदास दौलत चितारे (७२), सुरज बापू साथाळे (३६), लक्ष्मण राम कोवेम्मुला (६५) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार पंकज कैलास भदाने (३४) यांनी देहूरोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मटका जुगाराचे आकडे लिहून घेऊन पैसे घेत होते. याबाबत पोलिसांना माहिती मिळाली असता त्यांनी छापा मारून कारवाई केली. आरोपी मुंबई कल्याण मटका नावाचा मटका खेळत असल्याचे तपासात समोर आले आहे.






















Join Our Whatsapp Group