पिंपरी (Pclive7.com):- श्री.फत्तेचंद जैन विद्यालय व ज्युनिअर कॉलेजमध्ये पिंपरी-चिंचवड चार्टर्ड अकौंटन्ट असोसिएशनच्या माध्यमातून वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांसाठी ‘व्यवसाय मार्गदर्शन व वाणिज्य शाखेतील करिअर संधी’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी संस्थेचे ऑनररी जनरल सेक्रेटरी आदरणीय ॲड.राजेंद्रकुमार शंकरलाल मुथा तसेच संस्थेचे सहाय्यक सेक्रेटरी अनिल कुमार मोतीलाल कांकरिया यांनी शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाची सुरुवात ‘नवकार महामंत्रा’च्या पवित्र जापाने झाली. कार्यक्रमासाठी प्रमुख व्याख्याता सी.ए प्राजक्ता चिंचोलकर यांनी वाणिज्य शाखेतील उत्तम करिअर म्हणून ‘सी.ए या कोर्सची सखोल माहिती ‘ तसेच ‘विविध व्यवसाय संधी’ याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षा महाविद्यालयाच्या प्राचार्या सौ.नवले सुनिता यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थीदशेतील कष्टाचे महत्व विद्यार्थ्यांना पटवून सांगितले. कॉलेजचे उपप्राचार्य अनिल गुंजाळ यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.याप्रसंगी सी.ए धीरज बलदोटा, सी.ए कनिष्का खानोलकर, सी.ए मनीषा पालेकर तसेच सौ. ताराबाई शंकरलालजी मुथा कन्या प्रशाला व ज्युनिअर कॉलेजच्या विभाग प्रमुख सौ. पाटील सुचिता आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन देशपांडे भूषण व आभार प्रदर्शन सी.ए रिंकू अग्रवाल व श्रीमती साधना भळगट यांनी केले. कार्यक्रमासाठी महाविद्यालयाच्या कला व वाणिज्य विभागप्रमुख श्रीमती.भळगट साधना, विज्ञान विभाग प्रमुख सौ. कालेकर तेजस्विनी, एम. सी. व्ही.सी विभागप्रमुख श्री. लोखंडे भाऊसाहेब, सांस्कृतिक विभाग प्रमुख सौ.तांबोळी ताहेरा व सौ.चानोदिया स्नेहल, सर्व शिक्षकवृंद व श्री.फत्तेचंद जैन विद्यालय व ज्युनिअर कॉलेज व सौ. ताराबाई शंकरलालजी मुथा कन्या प्रशाला व ज्युनिअर कॉलेजमधील विद्यार्थी उपस्थित होते.






















Join Our Whatsapp Group