पिंपरी (Pclive7.com):- पूर्णानगर चिखली येथे श्री. निलेशदादा नेवाळे सोशल फाउंडेशन आयोजित भव्य दहीहंडी उत्सव २०२५ मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला.

निलेशदादा नेवाळे सोशल फाउंडेशनच्या वतीने गोकुळाष्टमीचा सन दोन दिवस साजरा करण्यात आला. दि.१६ ऑगस्ट रोजी घरकुल चिखली आणि दिनांक १७ ऑगस्ट रोजी शनी मंदिर ग्राउंड पूर्णानगर चिखली येथे दहीहंडीचा सण जल्लोषपूर्ण वातावरणात पार पडला.

भोसरी विधानसभेचे आमदार महेश दादा लांडगे यांची प्रमुख उपस्थिती कार्यक्रमाला होती. सोबत भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक ११ चे आजी माजी नगरसेवक आणि पदाधिकारी उपस्थित होते. सिने अभिनेत्री उर्मिला कानिटकर आणि रितुजा शिंदे या प्रमुख आकर्षण म्हणून उपस्थित होत्या.

चेंबूरचे साई सिद्धी गोविंदा पथक, ठाणे चे जय गणेश गोविंदा पथक आणि चाकण चे महात्मा फुले गोविंदा पथक यांच्या हस्ते दहीहंडी फोडण्यात आली. परिसरातील लोकांनी पावसाच्या सरींमध्येही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि अत्यंत जल्लोषपूर्ण वातावरणामध्ये कार्यक्रम पार पडला.























Join Our Whatsapp Group