पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिका व मेट्रो प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभारामुळे शहरातील नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते मारूती भापकर यांनी केला आहे.

मारुती भापकर यांनी यासंदर्भात मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर आणि पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त शेखर सिंह यांना निवेदन दिले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड शहरामध्ये स्वारगेट ते पिंपरी हे पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले. दुसऱ्या टप्प्यामध्ये पिंपरी ते निगडी मेट्रोचे काम सुरू असून हे काम अतिशय संथ गतीने सुरू आहे. तसेच रस्ता अरुंद झाल्यामुळे व मेट्रोच्या कामामुळे मोठमोठे खड्डे निगडी ते चिंचवड स्टेशन या रस्त्यावर पर्यंत पडलेले आहेत.
या रस्त्यांच्या खड्ड्यांबाबत पुणे मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांच्याकडे तक्रार केली असता ते या तक्रारीचे वेळेत गांभीर्याने निराकरण करत नाहीत. महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे तक्रार केली असता प्रशासनाकडून या रस्त्याच्या खड्ड्यांची जबाबदारी महा मेट्रोची आहे, असे उत्तर आम्हाला मिळते.

खरे तर या रस्त्यांच्या खड्ड्यामुळे शेकडो लोकांचे अपघात या रस्त्यावरील अत्यंत धोकादायी व जीव घेणे खड्ड्यांमुळे झाले आहेत. कोणाचे डोके फुटले आहेत, कोणाचे हात मोडले आहे, कोणाचे पाय मोडले आहेत. तरीही मेट्रो प्रशासन व महापालिका प्रशासन यांना घाम फुटत नाही. दया येत नाही.

आम्ही आपणास इशारा देत आहोत की आपण या गंभीर विषयाबाबत महापालिका प्रशासन व पुणे मेट्रो प्रशासन यांनी एकत्रित बैठक घेऊन एकमेकांशी योग्य समन्वय साधून तातडीने या समस्येवर ठोस उपाययोजना राबवाव्यात व शहरातील नागरिकांचे जीवन सुरक्षित करावे.

जर या समस्येच्या निराकारणाबाबत आपण तातडीने ठोस उपाययोजना केल्या नाहीत हे प्रकरण गांभीर्याने घेतले नाही तर आपल्या विरोधामध्ये आम्हाला जन आंदोलन करावे लागेल तसेच प्रसंगी आपल्या विरोधात कायदेशीर न्यायालयाचा मार्ग अवलंबावा लागेल असा इशारा मारुती भापकर यांनी दिला आहे.






















Join Our Whatsapp Group