

पिंपरी (Pclive7.com):- स्पाईन रोड येथील स्वामी विवेकानंद भुयारी मार्गात चार चाकी वाहनांना प्रवेश बंदी करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या कीर्ती मारुती जाधव यांनी वाहतूक विभागाला केली आहे.

कीर्ती जाधव यांनी निगडी वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुदाम पाचोरकर यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड शहरात कृष्णानगर प्रभागात शरदनगर, स्पाईन रोड परिसरातील होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी स्वामी विवेकानंद भुयारी मार्ग स्थापत्य विभागाने कोट्यावधी रुपये खर्चुन बांधला गेला आहे. परंतु हा भुयारी मार्ग बांधून पूर्ण होताच फेल गेल्याच्या अनेकदा चर्चा शहरात रंगल्या. काहींनी या प्रकल्पात त्रुटी असल्याचे वारंवार जाहिर केले. दरम्यान, पावसाळा सुरु झाला अन् गेल्या दोन महिन्यापासून ग्रेड सेपरेटर पाऊस आला की वाहतुकीला प्रचंड अडथळा निर्माण होतो. महापालिका आणि वाहतूक शाखा यांच्याकडून उपाययोजना केल्या जात आहेत. शरदनगर, घरकुल, कोयनानगर, महात्माफुले नगर,शिवाजी पार्क, वाढती लोकसंख्या, रस्त्यावर वाढणारी वाहनांची संख्या, होणारे अपघात, टाळण्यासाठी नागरिकांच्या मागणीनुसार भोयरी मार्गामध्ये होणाऱ्या चार चाकी वाहनांना प्रवेश बंद करावा अशी मागणी करण्यात येत आहे. तसेच वॉर्डन ठेवून दुचाकी वाहनांसाठी उपाययोजना करण्यात यावी. असे निवेदन लोकशाहीर जगविख्यात साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे प्रतिष्ठान यांच्या वतीने देण्यात आले.

निवेदन देताना अण्णाभाऊ साठे प्रतिष्ठानचे अध्यक्ष मारुती जाधव, दत्तात्रय धरमे, अभी जाधव, विशाल गरड, रोहित गरड, कुणाल पळसकर, सेफ खान, अक्षय ओहोळ, तेजस कडलक तसेच घरकुल शरद नगर परिसरातील नागरिक उपस्थित होते.























Join Our Whatsapp Group