

पिंपरी (Pclive7.com):- भाजपाचे युवा नेते सोमनाथ तापकीर यांच्या वाढदिवसानिमित्त काळेवाडी परिसरातील दहावी व बारावीत उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव व करिअर मार्गदर्शन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. मंगळवार दि.२६ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी ०४ ते सायंकाळी ६ या वेळेत बीआरटी रोड, विजयनगर, काळेवाडी येथील आरंभ बँक्वेट हॉल (भोईर लॉन्स) येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

युवानेते सोमनाथ तापकीर यांच्या वाढदिवसानिमित्त काळेवाडी परिसरात विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त ओम साई ग्रुप तापकीर नगरच्या वतीने काळेवाडी परिसरातील दहावी, बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला आहे. यावेळी एसएससी बोर्डाचे सचिव, शिक्षणाधिकारी सहाय्यक आयुक्त अनिल गुंजाळ यांचे मार्गदर्शनपर व्याख्यान संपन्न होणार आहे. याप्रसंगी चिंचवड विधानसभेचे आमदार शंकर जगताप पिंपरी चिंचवड भाजपा शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे सर्व माजी नगरसेवक पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

दरम्यान, दहावी व बारावीतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी लकी ड्रॉ चे आयोजन करण्यात आले आहे. यात सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी त्यांच्या बोर्ड मार्कशिटची प्रत सोमनाथदादा तापकीर यांचे जनसंपर्क कार्यालय, तापकीर मळा, नानाश्री हॉटेल जवळ जमा करावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

तर या लकी ड्रॉ मध्ये विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात बक्षिसाचे वितरण करण्यात येणार आहे. प्रथम पाच क्रमांकाच्या विद्यार्थ्यांना आर्थिक मदत स्वरूपात पहिले बक्षीस दिले जाणार आहे. तसेच द्वितीय क्रमांकाचे बक्षीस म्हणून 64 जीबी टॅब दिला जाणार आहे. तर तृतीय क्रमांकाचे बक्षीस म्हणून विद्यार्थ्यांना सॅग (बॅग) भेट स्वरूपात दिली जाणार आहे.






















Join Our Whatsapp Group