पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड प्रादेशिक परिवहन विभागात (आरटीओ) वाहतूक नियमन उल्लंघन आणि विविध थकीत दंडाची सुमारे १० कोटींपर्यंत रक्कम थकीत आहे. ही रक्कम वाढत जात असल्याने अखेर आरटीओकडून संबंधित वाहन चालकांना मेसेज पाठवले जात आहेत.

मागील वर्षापासून लघुसंदेश सेवां तर्गत वाहनधारकास सीपी-आरटीओपीसीएम या नावाने लघु संदेश सुविधा सुरू करण्यात आली आहे. संबंधित खासगी कंपनीशी आरटीओ विभागाने करार देखील केला आहे. त्यामुळे आरटीओकडून वाहनधारकांचा नंबर संबंधित कंपनीकडे गेल्यानंतर त्वरित मेसेज प्राप्त होत आहेत.

आरटीओकडे थकीत दंड न भरणाऱ्या वाहन चालकांची यादी वाढतच चालली आहे. वाहन चालकांना नोटीस पाठवूनही प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे अखेर आरटीओने खासगी कंपनीमार्फत ही सेवा सुरू केली आहे. या संदेशामध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक केल्यानंतर कार्यालयाचे इंग्रजी व मराठी स्वरूपातील मागणीपत्र नागरिकांना पाहता येणार आहे, असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राहुल जाधव यांनी सांगितले. क्रमांकांची यादी या कंपनीकडे देण्यात आली आहे. टप्प्याटप्प्याने संबंधित वाहनधारकाला मेसेज पोहोचत आहेत. वाहनधारकांनी कर वेळेवर भरण्याची आवश्यकता आहे, अन्यथा प्रशासनाकडून कठोर पावले उचलण्याची शक्यता आहे.

मुंबई-पुणे महामार्गावर वाहतुकीचे नियमभंग करणाऱ्यांना दंड ठोठावले जातात. ते दंडही पिंपरी-चिंचवड आरटीओत येतात. त्यामुळे दंडाची रक्कम जास्त वाढत आहे.– राहुल जाधव, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी





















Join Our Whatsapp Group