पिंपरी (Pclive7.com):- निगडी येथे भक्ती-शक्ती उड्डाणपूल ते श्रीकृष्ण मंदिरापर्यंतच्या सेवा रस्त्यावर मेट्रो रेल्वे विस्ताराचे काम सुरु आहे. या ठिकाणी रस्त्यांवर फार खड्डे पडले असून त्यात पावसाचे पाणी साचले आहे. पाण्याने भरलेले खड्डे चटकन दिसून येत नसल्याने येथे अपघात होण्याची शक्यता आहे. शिवाय श्रीकृष्ण मंदिरापर्यंत जाण्यासाठीही अडथळा निर्माण झाला आहे. या प्रश्नावर महापालिकेने तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते सचिन काळभोर यांनी केली आहे.

याविषयी काळभोर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मेट्रो विस्ताराच्या कामामुळे भक्ती-शक्ती उड्डाणपूल ते श्रीकृष्ण मंदिर सेवा रस्त्यावर रस्त्यावर खड्डे खोदले आहेत. त्यामुळे नागरिकांना श्रीकृष्ण मंदिरात जाण्या-येण्यासाठी अडथळा निर्माण झाला आहे. अंकुश चौक ते निगडी प्राधिकरण पोलिस स्टेशन भुयारी मार्ग बंद झाल्याने नागरिकांना विनाकारण त्रास सहन करावा लागतो.

गेले दोन महिन्यांपासून खोदलेल्या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचले आहे, त्यामुळे खड्डे दिसत नाही. परिणामी इथे अपघात होण्याची शक्यता आहे. येथे दिशादर्शक फलक लावलेला नाही तसेच सुरक्षा रक्षक किंवा ट्रफिक वार्डन नाही त्यामुळे ही स्थानिक नागरिकांसाठी ही रोजची समस्या बनली आहे. अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केले आहे.

या प्रश्नाची दखल घेऊन महापालिकेने येथे सुरक्षा रक्षक किंवा ट्रफिक वार्डन नेमावेत तसेच येथे दिशादर्शक फलक लावण्यात यावा. अंकुश चौक ते श्रीकृष्ण मंदिर रस्ता जाण्या-येण्यासाठी सुरू करण्यात यावा. महापालिका आयुक्तांनी या विषयात लक्ष घालून तातडीने कार्यवाही करावी, असे सचिन काळभोर यांनी म्हटले आहे.























Join Our Whatsapp Group