पिंपरी (Pclive7.com):- देहूरोड परिसरात एका दुचाकी चालकाचा डंपरच्या धडकेत मृत्यू झाला. ही घटना रविवारी (दि.३१) सकाळी साडे नऊ वाजता किवळे येथे घडली. डंपर चालक फोनवर बोलत गाडी चालवत होता, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. देहूरोड पोलिसांनी चालकाला ताब्यात घेतले आहे.

मृत तरुणाचे नाव दीपक बहादूर साई (वय ३२, विकासनगर, देहूरोड) असे आहे. पोलिसांनी डंपर चालक प्रदीप मयूर यादव (उत्तर प्रदेश) याला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दीपक साई आपल्या दुचाकीवरून कामावर जात होते. ते एका खासगी सुरक्षारक्षक म्हणून कार्यरत होते. किवळे येथील साई द्वारका हाउसिंग सोसायटीसमोरून जात असताना भरधाव वेगाने आलेल्या डंपरने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात दीपक यांचा जागीच मृत्यू झाला. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.























Join Our Whatsapp Group