पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरात मेट्रोला दिवसेंदिवस मोठा प्रतिसाद मिळत आहे. भविष्यात नागरिकांचे वाढते नागरीकरण आणि प्रवाशांची संख्यावाढ लक्षात घेता ३ ऐवजी ६ कारची मेट्रो करण्यात यावी अशी सूचनावजा मागणी चिंचवड विधानसभेचे आमदार शंकर जगताप यांनी केली.

पिंपरी-चिंचवड शहराची ओळख ‘‘मेट्रो सिटी’’ अशी व्हावी. या करिता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली मेट्रो, पीएमआरडीए, पीसीएमसी आणि संबंधित विभागाकडून सक्षमपणे काम सुरू आहे. शहरातील नवीन मेट्रो विस्तारीकरणाच्या सविस्तर प्रकल्प अहवालाच्या सादरीकरण करण्यासंदर्भात आज फुगेवाडी येथे महत्वपूर्ण बैठक पार पडली.

या बैठकीला विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, खासदार श्रीरंग बारणे, आमदार शंकर जगताप, पुणे मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डिकर, महापालिका आयुक्त शेखर सिंह आणि संबंधित विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

महाराष्ट्र मेट्रोरेल कॉर्पोरेशन लि. पुणे यांनी पिंपरी चिंचवड शहरातील भक्ती शक्ती – वाकड – नाशिक फाटा – चाकण या मेट्रो मार्गिकेचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यात आला आहे. त्याचे आवलोकन केले आणि प्रशासनाला काही सूचनाही यावेळी आमदार शंकर जगताप यांनी केल्या आहेत.
पिंपरी चिंचवड शहरात मेट्रोला दिवसेंदिवस मोठा प्रतिसाद मिळत आहे. भविष्यात नागरिकांचे वाढते नागरीकरण आणि प्रवाशांची संख्यावाढ लक्षात घेता, ३ नव्या ऐवजी ६ कारची मेट्रो करण्यात यावी अशी सूचनावजा मागणी चिंचवड विधानसभेचे आमदार शंकर जगताप यांनी केली आहे.

प्रस्तावित मेट्रो स्थानकांचा विस्तार आणि नवीन स्थानकांची निर्मीती करुन मेट्रोचे जाळे सक्षम करुन इंडस्ट्रिअल आणि रेसिडेन्सिअल कॉरिडॉरची कनेक्टिव्हीटी वाढवण्यासाठी आम्ही सातत्त्याने पाठपुरावा करीत आहोत. सुरुवातीला स्वारगेट ते पिंपरी अशी मेट्राे मार्गाची घोषणा झाली. त्यानंतर भाजपा महायुती सरकारच्या माध्यमातून कात्रज ते निगडी अशा मार्गाचे काम प्रगतीपथावर आहे. आता आयटीहब हिंजवडी, औद्योगिक पट्टा चाकण आणि शहरातील प्रमुख क्षेत्रांना जोडणाऱ्या मेट्रो मार्गिका विकसित करण्यात येत आहेत.– आमदार शंकर जगताप, चिंचवड विधानसभा






















Join Our Whatsapp Group