पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड पोलिसांनी अवैध धंद्यांवर कडक कारवाईचा बडगा उगारत शहरातील जुगार अड्ड्यांवर मोठी मोहीम राबवली. दिघी येथे टाकलेल्या छाप्यात २७ जणांना अटक करण्यात आली. यामध्ये सराईत धंदेवाल्यांचा समावेश आहे. अटक आरोपींसह ३१ जणांविरोधात गुन्हे दाखल झाले असून, ३४ लाख १४ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त करण्यात आला आहे.

या कारवाईत २६ मोबाईल फोन, तीन कार, पाच दुचाकी, तसेच रोख रकमेसह एकूण ३४ लाख १४ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला. यामुळे शहरातील अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणाणले आहेत.

आगामी गणेशोत्सव, नवरात्र, ईद आणि निवडणुकांचा काळ लक्षात घेऊन पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध धंद्यांवर कारवाईचा धडाका सुरू आहे. बेकायदेशीर शस्त्र जप्ती मोहिमेत आतापर्यंत १३० हून अधिक घातक शखे ताब्यात घेण्यात आली आहेत. त्याचसोबत दारू भट्ट्या, अवैध दारू विक्री वाहतूक, तसेच प्रतिबंधित गुटखा विक्री व साठवणूक यावरही कारवायांची मालिका सुरू आहे. जुगार अड्ड्यांवरील ही मोठी मोहीम त्याच धडाक्याचा भाग असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

अटक आरोपींची यादी
छाप्यात अटक करण्यात आलेल्यांत शुभम गणेश सांळुके (३०, रा. विश्रांतवाडी), मयुर सुदाम धापटे (२९, रा. कलस, हवेली), आकाश नवनाथ चौधरी (२९, रा. पिंपरी), हुकूमसिंग डीडीसिंग कल्याणी (३९, रा. हडपसर), संतोष सदाशिव राखप सरे (४५, रा. लोहगाव), उमेश सोपान प्रधान (३४, रा. मोशी), किशोर रामचंद्र पाटोळे (४१, रा. हडपसर), शरद काशीनाथ शेडगे (४२, रा. महाळुंगे पाडाळे), मनी उर्फ जॉकी भगवान तिवारी (२८, रा. विमाननगर), अतुल राजू देवकर (३४, रा. विश्रांतवाडी), जालिदंर मधुकर शिंदे (४३, रा. भोसरी), सुशांत जालिंदर पवार (२८, रा. पुरंदर), सुरेश उर्फ जॉकी किसन राठोड (३१, रा. पिंपळे गुरव), गणपत विठ्ठल लांडगे (६२, रा. भोसरी), दशरथ उर्फ जॉकी अमरसिंग पवार (३४, रा. विश्रांतवाडी), अंकुश उर्फ जॉकी गायकवाड (३३, रा. निगडी), निखिल राजू देवकर (३१, रा. विश्रांतवाडी), गुड्डू उर्फ जॉकी रणजित रवाणी (३४, रा. हडपसर), पवन पंडीत मौजे (३३, रा. लोहगाव), मारुती उर्फ जॉकी ईश्वर सुरवसे (३०, रा. मुंढवा), अतुल अमृत मोहिते (३२, रा. आंबेठाण), प्रणय अंकुश जाधव (२०, रा. दिघी), अक्षय गोरक्षनाथ बोकड (२६, रा. दिघी), मंगेश कैलास भिंगारे (२३, रा. दिघी), सुधीर हरजितरॉय नागपाल (६०, रा. अहिल्यानगर), अन्सार साहेबलाल शेख (६४, रा. हडपसर), वसंत नामदेव बोरहाडे (४७, रा. चरहोली खुर्द) यांचा समावेश आहे. याशिवाय निरंजन तुळशीदास मंगळवेडेकर (रा.चिंचवड), केतन झोरे (रा. चरहोली बुद्रुक), रासकर (पूर्ण नाव व पत्ता माहिती नाही. आणि इतर तिघांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.






















Join Our Whatsapp Group