चिंचवड (Pclive7.com):- चिंचवड लिंकरोड वरील उत्कर्ष मित्र मंडळांनी यंदा अक्कलकोट स्वामींचा समाधी मठ व भव्य वटवृक्ष साकारला आहे.

या देखाव्याला भाविकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून मंडळांनी वृक्षारोपणाच्या माध्यमातून लावलेला २० वर्षे पूर्वीचा वटवृक्ष आता खूप मोठा झाला आहे. त्याच्या खाली ठेवलेली स्वामींची मूर्ती सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

मंडळाचे यंदाचे हे ५४ वे वर्ष असून नकुल आनंदा भोईर हे मंडळाचे अध्यक्ष आहेत. मंडळाच्या माध्यमातून वर्षभर गणेश जयंती, महिलांसाठी धुलीवंदन, नवरात्र उत्सव, क्रीडा स्पर्धा, आरोग्य शिबिरे, रक्तदान शिबिरे, पर्यावरण जन जागृती वृक्षरोपण असे अनेक उपक्रम राबवले जातात.























Join Our Whatsapp Group