पिंपरी (Pclive7.com):- एसपीव्हीएस ग्रुप ऑफ कंपनीच्या दोन डायरेक्टर आणि पार्टनर्सनी लोकांना चांगल्या परताव्याचे आमिष दाखवून तब्बल १ कोटी २६ लाख ७५ हजार ४८३ रुपयांची आर्थिक फसवणूक केली. ही घटना मार्च २०२३ ते ३० ऑगस्ट या कालावधीत निगडी येथील भेळ चौक परिसरात घडली.

या प्रकरणी ४९ वर्षीय व्यक्तीने निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी विकास दादा निकम (रा. कोपर खैरणे, नवी मुंबई) आणि सचिन बाबासाहेब डोंगरे (रा.कलकी, ता. फलटण, जि. सातारा) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी कट रचून गुंतवणूक केल्यास चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवले. सुरुवातीला काही रक्कम परतावा म्हणून देऊन त्यांनी गुंतवणूकदारांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर, फिर्यादीने गुंतवलेले ६० लाख ७५ हजार ४८३ रुपये आणि त्यांच्या नातेवाईक व मित्रांनी गुंतवलेले ६६ लाख रुपये, अशी एकूण १ कोटी २६ लाख ७५ हजार ४८३ रुपये त्यांनी स्वतःच्या फायद्यासाठी वापरून परत न करता फसवणूक केली.























Join Our Whatsapp Group