
पिंपरी (Pclive7.com):- दरोड्याच्या तयारीत असलेल्या रावण टोळीच्या तिघा सदस्यांसह दोन अल्पवयीन आरोपींना गुन्हे शाखेच्या गुंडा विरोधी पथकाने अटक केली आहे. त्यांच्याकडून चार देशी बनावटीची पिस्तुले, तीन जिवंत काडतुसे, एक वापरलेले काडतूस आणि बलेनो कार असा एकूण ८ लाख ३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

अनिकेत अशोक बाराथे (२७, रा. दापोडी), अश्विन सुधीर गायकवाड (२१, रा. जयभिमनगर, दापोडी), यशपालसिंग अरविंदसिंग देवडा (१९, रा. विनायकनगर, नवी सांगवी) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तसेच, दोन अल्पवयीन मुलांनाही ताब्यात घेण्यात आले आहे.

सहायक पोलिस निरीक्षक हरीश माने यांनी दिलेल्या माहितीनुसार, १७ सप्टेंबर रोजी पाटीलनगर, चिखली येथे आरोपींनी दरोड्याच्या तयारीत शस्त्रसाठा ठेवून जमाव जमविला होता. याप्रकरणी चिखली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने बातमीच्या आधारे सांगवी परिसरातून उर्वरित आरोपींना जेरबंद केले. त्याच्याकडून चार पिस्तुल जप्त करण्यात आली.

दरम्यान, नुकतेच काही दिवसांपूर्वी गुंडा विरोधी पथकाने रावण टोळीच्याच सात जणांच्या मुसक्या आवळल्या होत्या. त्यांच्याकडूनही पिस्तुल, ऑडी कार आणि दरोड्यासाठी लागणारे साहित्य जप्त करण्यात आले होते. गुंडा विरोधी पथकाने टोळ्यांचा बिमोड करण्यासाठी उचलल्या या पावलामुळे गुन्हेगार सैरभैर झाले आहेत. पोलिस आयुक्तालयच्या वरिष्ठ स्तरावरुनदेखील या कामगिरीचे कौतूक केले जात आहेत.

सदरची कारवाई ही सहायक पोलीस निरीक्षक एच.व्ही. माने, पोलीस उपनिरीक्षक समिर लोंढे, प्रविण तापकीर, सहायक पोलीस फौजदार सोपान ठोकळ, विक्रम जगदाळे, अमित गायकवाड, पोलीस हवालदार गणेश मेदगे, गंगाराम चव्हाण, विजय गंभीरे, सुनिल चौधरी, मयुर दळवी, शाम बाबा, नितीन गेंगजे, विजय तेलेवार, पोलीस शिपाई रामदास मोहीते, विजय वेळापुरे, ज्ञानेश्वर गिरी, संकेत घारे, शुभम कदम, तौसिफ शेख यांनी केली आहे.























Join Our Whatsapp Group