
पिंपरी (Pclive7.com):- मराठवाड्यातील ओला दुष्काळ भीषण स्वरूप धारण करून शेतकरी, कामगार तसेच विद्यार्थ्यांवर मोठा परिणाम झाला आहे. अनेक विद्यार्थ्यांचे पुस्तके, वह्या, दप्तर, गणवेश व इतर शालेय साहित्य पाण्यात भिजून नष्ट झाले असून शिक्षणाची प्रक्रिया खंडित होण्याचा धोका निर्माण झाला आहे.

या पार्श्वभूमीवर रयत विद्यार्थी विचार मंच संस्थेच्या वतीने विद्यार्थ्यांना शालेय साहित्याची मदत करण्यात येणार आहे. या उपक्रमात शहरातील नागरिक, सामाजिक संस्था, व्यापारी वर्ग, शिक्षक व विद्यार्थी यांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन शालेय साहित्य जमा करून मदतीचा हात पुढे करावा, असे आवाहन करण्यात येत आहे.

संकलित साहित्य तातडीने मराठवाड्यातील प्रभावित भागांतील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविले जाणार आहे. विद्यार्थ्यांचे शिक्षण खंडित न होता ते निर्धास्तपणे शाळेत जावे, हा आमचा उद्देश आहे, असे संस्थेचे पदाधिकारी म्हणाले.

आवाहनकर्ता
अॅड. धम्मराज साळवे
संस्थापक अध्यक्ष, रयत विद्यार्थी विचार मंच
मो. ८०८७५४०३८४
संपर्कासाठी
प्रा. विक्रांत शेळके सर
मो. ७३५०८८५७३४


























Join Our Whatsapp Group