
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या वतीने ज्येष्ठ नागरिक सुसंवाद मेळावा संपन्न
पिंपरी (Pclive7.com):- ज्येष्ठ नागरिकांची सुरक्षा व सेवेसाठी पिंपरी चिंचवड पोलीस सदैव कटिबध्द आहे असे प्रतिपादन पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी केले. जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनाचे औचित्य साधुन आज (दि.२६) पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या अभिनव संकल्पनेतुन प्रा. रामकृष्ण मोरे सभागृह, चिंचवड येथे ज्येष्ठ नागरिकांचा सुसंवाद मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्या करीता सुमारे १२०० ज्येष्ठ नागरिकांनी उपस्थित राहून उदंड प्रतिसाद दिला.

या मेळाव्याकरीता पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, पोलीस सह आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड, जेष्ठ नागरिक महासंघाच्या अध्यक्षा श्रीमती वृषाली मरळ तसेच सर्व पोलीस उप आयुक्त उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक पोलीस उप आयुक्त (गुन्हे) डॉ. शिवाजी पवार यांनी केले. त्यानंतर उपस्थित ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक गुन्हे, सायबर गुन्हे, ट्राफिक बडी ॲप व ज्येष्ठानुबंध ॲप याबाबत चित्रफितीद्वारे माहिती देवुन जनजागृती करण्यात आली. या प्रसंगी जेष्ठ नागरिक महासंघाच्या अध्यक्षा श्रीमती वृषाली मरळ यांनी त्यांचे मनोगत व्यक्त करुन या उपक्रमाची प्रशंसा केली व आभार व्यक्त केले.

यावेळी नागरिकांना पोलीस दलाविषयी सुचना व प्रश्न विचारण्याची संधी देण्यात आली. त्याला पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी त्यांच्या मनोगतात समर्पक उत्तरे देवुन सबंधीतांचे शंका निरसण केले. त्याचप्रमाणे पोलीस आयुक्तांनी सायबर गुन्ह्यांना प्रतिबंध करण्यासाठी घ्यावयाची दक्षता तसेच ज्येष्ठ नागरिकांना सेवा व सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी तयार करण्यात आलेले ज्येष्ठानुबंध ॲपची माहिती दिली. पोलीस आयुक्तांनी सर्व ज्येष्ठांना नमुद ॲपमध्ये मोठ्या संख्येने नोंदणी करुन त्याचा उपयोग करुन घ्यावा असे आवाहन केले तसेच सर्व ज्येष्ठांना कायदेशीर तसेच वैयक्तीक स्वरुपाच्या अडचणींचे निरासण करण्यासाठी पिंपरी चिंचवड पोलीस कटीबध्द असल्याचे आश्वासन दिले.

सदरचा मेळावा हा पिंपरी चिंचवड परिसरात एवढ्या मोठ्या प्रमाणात आयोजित केलेला पहिला मेळावा असुन ज्येष्ठ नागरिकांनी त्याबद्दल समाधान व्यक्त केले आहे. मेळाव्याचे आयोजन पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या संकल्पनेतून व पोलीस सह आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) डॉ. शिवाजी पवार, सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे) विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक (कम्युनिटी पोलीसिंग) तेजस्वीनी कदम, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सायबर पोलीस ठाणे रविकिरण नाळे, पोलीस उप निरीक्षक, गावडे, पोलीस हवालदार शेळके, महिला पोलीस हवालदार सुषमा पाटील यांनी यशस्वीरित्या आयोजन केले.


























Join Our Whatsapp Group