

पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरातील उदयनमुख खेळाडू समृद्धी भोईर हिची १८ वर्षाखालील मुलींमध्ये राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. समृद्धी भोईर हिने बालेवाडी स्टेडियम मध्ये हेप्टाथलॉन या इव्हेंटमध्ये प्रथम क्रमांक मिळवला होता. त्यामुळे तिची निवड राष्ट्रीय स्पर्धेसाठी झाली आहे.

४० वी नॅशनल जूनियर ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप ही स्पर्धा भुवनेश्वर येथे ओडिशा राज्यात कलिंगा स्टेडियम मध्ये होणार आहे. दि.१० ते १४ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत ही स्पर्धा संपन्न होणार आहे. या स्पर्धेत अनेक राज्यातील खेळाडू सहभागी होणार आहेत.

समृद्धी भोईर प्रशिक्षक चंद्रशेखर कुदळे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करीत आहे. पीसीएमसीच्या इंद्रायणी नगर येथील संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुल येथे सराव करीत आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे क्रीडा आयुक्त पंकज पाटील व क्रीडा अधिकारी कारंडे साहेब यांचे मोलाचे सहकार्य तिला मिळाले आहे.

साई स्पोर्ट्स अकॅडमीत गेले कित्येक वर्ष प्रशिक्षक चंद्रशेखर कुदळे यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक खेळाडू घडवले गेले आहेत. संत तुकाराम क्रीडा संकुल इंद्रायणी नगर भोसरी येथे अनेक राष्ट्रीय खेळाडू नियमितपणे त्यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत आहेत. पिंपरी चिंचवड आणि बाहेरच्या जिल्ह्यातील अनेक खेळाडू त्यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करीत आहे व त्यांनाही त्यांच्या जिल्ह्यात यश प्राप्त होत आहे.























Join Our Whatsapp Group